शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

बुद्ध पौर्णिमेला घ्या 'निसर्ग अनुभव'; मचानीहून करा वन्यप्राण्यांची प्रगणना, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा पुढाकार

By गणेश वासनिक | Updated: April 27, 2023 17:36 IST

सहा वन्यजीव विभागात आजपासून ऑनलाईन बुकींग प्रारंभ

अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदा ५ मे राेजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटकांना वन्यप्राण्यांची प्रगणना वजा दर्शन करता येणार आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी मचानीचीवर थांबण्यासाठी ऑनलाईन बुकींग करणे अनिवार्य असून, २८ एप्रिलपासून संकेतस्थळ सुरु होणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत सहा वन्यजीव विभागात 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम राबविला जात आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत ५ मे रोजी सिपना, गुगामल, अकोट, मेळघाट, अकोला आणि पांढरकवडा या सहा वन्यजीव विभागात 'निसर्ग अनुभव' साठी बोर्डिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहे. ऑनलाईन आरक्षणकरिता १३२ मचानीची संख्या आहे. व्हीव्हीआयपींसाठी २४ आरक्षित मचानी निश्चित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी केवळ संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची बुकींग ग्राह्य धरण्यात येणार नाही.

बोर्डिंग पॉईंटवर सहभागी झालेल्या निसर्ग प्रेमींचे आगमन झाल्यानंतर क्रमवार नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर क्रमवार नाेंदणीनुसार ईश्वर चिठ्ठीद्वारे मचानचे वाटप केले जाणार आहे. निसर्ग प्रेमिंकरिता ५ मे रोजीचे दुपारी आणि रात्रीचे जेवण, पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाणार आहे. ६ मे रोजी सकाळी अल्पोपहारची व्यवस्था केली जाणार आहे. प्रगणना पूर्ण झाल्यानंतर निसर्ग अनुभव उपक्रमाचा अहवाल, समाविष्ट कर्मचारी, निसर्ग प्रेमी यांच्या संख्यासह १५ मे पर्यंत कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.

वन्यजीव विभाग निहाय हे आहेत बोर्डिंगचे ठिकाण

  • गुगामल वन्यजीव : सेमाडोह, चिखलदरा, ढाकणा, तारूबांदा
  • अकोट वन्यजीव : सोमठाणा, धारगड,घटांग, गाविलगड
  • मेळघाट वन्यजीव : गाविलगड, जामली, अकोट, धुळघाट
  • अकोला वन्यजीव : वाघा, काटेपूर्णा, कारंजा, सोहोळ, बोथा, ज्ञानगंगा, लोणार
  • पांढरकवडा वन्यजीव : माथनी, टिपेश्वर, खरबी, कोरटा, बीटरगाव, सोनदाभी

निसर्ग प्रेंमीसाठी 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम ५ मे रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्गत राबविला जाणार आहे. मचानीहून वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाणार आहे. ऑनलाईन बुकींगशिवाय ते शक्य होणार नाही.

- एम.एन. खैरनार, विभागीय वनाधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीवMelghatमेळघाटAmravatiअमरावती