अवजड वाहतुकीचा परिणाम, प्रवाशांमध्ये संताप
राजुरा बाजार : नजीकच्या हातुर्णा-लोणी रस्त्यावर अवजड वाहतुकीने रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांकडे बांधकाम विभागाने कायम डोळेझाक केल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्याचे शेवटचे टोक हातुर्णा येथून लोणी गावाला जाण्यासाठी बेलोरा, भापकी, आलोडा, परसोडा, नांदगाव या गावांतून सहा किमी रस्ता आहे. अवजड वाहनांनी या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कुठे कुठे तर दोन फुटांचे खड्डे आहेत. काटेरी झुडपे ही रस्त्यावर आली आहेत. खड्ड्यांमुळे या मार्गाने दैनंदिन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मानेचे व कमरेचे दुखणे जडले आहे. दुचाकीचालकही या रस्त्याने नाईलाजानेच वाहन चालवितात. संबंधित विभागाने या मार्गाची डागडुजी
करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
---------
आमची बाजार पेठ ही लोणी आहे. त्यामुळे नियिमत ये-जा करावी लागते. चारचाकी-दुचाकी तर सोडा, पायी चालणेही या रस्त्याने मुश्कील झाले. या रस्त्यावरील खड्डे बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्त करावेत.
- राजेंद्र ताथोडे, बेलोरा (ताथोडे), ता. वरूड