"Hathras rape cruelty defames humanity"; Candle march led by Yashomati Thakur | "हाथरसच क्रौर्य मानवतेला काळिमा फासणारं"; यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात कँडल मार्च

"हाथरसच क्रौर्य मानवतेला काळिमा फासणारं"; यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात कँडल मार्च

अमरावती - उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इर्विन चौकात  कँडल मार्च आंदोलन करण्यात आलं, मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी केली, उत्तरप्रदेशातील हाथरस इथं एका असाह्य तरुणीवर सामूहिक अत्याचार होतो,हे कमी झालं मी काय म्हणून तिची जीभ छाटून तिच्या शरीराचे अक्षरशा लचके तोडले जातात, मानवतेला काळिमा फासणारी ही घटना,पण योगी सरकार मात्र केवळ  बघ्याची भूमिका घेत,या पेक्षा घृणास्पद काही असूच शकत नाही अशा शब्दात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

याबाबत यशोमती ठाकूर म्हणाल्या की, पीडित तरुणीला न्याय द्या अशी मागणी करणाऱ्या राहुल व प्रियांका गांधी यांच्यावर जर पोलीस बळाचा वापर करतात याचा आम्ही निषेध करतो, गंभीर अवस्थेत शेवटच्या घटका मोजणाऱ्या अत्याचार पीडितेला  उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिनं शेवटचा श्वास घेतला. पण प्रश्न हा आहे की, तिचा असा कोणता दोष होता,की तिचा असा विकृत पद्धतीनं शेवट व्हावा याच उत्तर योगी सरकारण द्यावं असं त्यांनी सांगितले.

तसेच आज आमची मान शरमेने झुकली आहे, या घटनेचा निषेध करावा यासाठी शब्दच नाहीत.पण आता आमच्या कुटुंबातील लेकी सुरक्षित आहेत का, याचा विचार देशातील तमाम नागरिकांनी करावा इतकी ही भयावह स्थिती आहे,असंही त्या म्हणाल्या.

Web Title: "Hathras rape cruelty defames humanity"; Candle march led by Yashomati Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.