हर्षदीप कांबळे घेतील का दखल ?
By Admin | Updated: October 7, 2016 00:21 IST2016-10-07T00:21:10+5:302016-10-07T00:21:10+5:30
येथील सार्वाधिक महाग असलेले; परंतु अळीयुक्त कचोरी आणि संशयास्पद खव्याची मिठाई विकणाऱ्या रघुवीर प्रतिष्ठानावर

हर्षदीप कांबळे घेतील का दखल ?
रघुवीरच्या दावणीला एफडीए : अमरावतीकरांच्या आरोग्याची कोण वाहणार चिंता?
अमरावती : येथील सार्वाधिक महाग असलेले; परंतु अळीयुक्त कचोरी आणि संशयास्पद खव्याची मिठाई विकणाऱ्या रघुवीर प्रतिष्ठानावर अन्न प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांची मेहेरनजर असल्याने या खात्याचे आयुक्त हर्षदीप कांबळे हे दखल घेतील काय, असा सवाल निर्माण झाला आहे.
रघुवीर प्रतिष्ठानच्या खाद्यान्नात आरोग्याला घातक असलेले कीटक आणि इतर वस्तू आढळल्याच्या अनेक तक्रारी आहेत. वेळोवेळी या तक्रारी रघुवीरकडेही करण्यात आल्या आहेत; तथापि ग्राहक एकटा पडल्याने तो फारसे काही करू शकला नाही. रघुवीरच्या कचोरीत मोठी अळी आढळल्याचे धक्कादायक वास्तव 'लोकतम'ने लोकदरबारात मांडल्यावर लोक बोलू लागले. अनेकांनी त्यांना झुरळ, फकडी, मोठे खडे आढल्याचे पण रघुवीरने ठटलवून लावल्याचे अनुभव 'लोकमत'शी शेअर केले. रघुवीरचे मिठाई उत्पादन शंकास्पद असतानाही सर्व प्रतिष्ठानच्या मिठाईचे नमुने एफडीएने घेतले नाही. रघुवीरच्या अनुचित व्यावसायिक प्रकाराला बळ देणाऱ्या एफडीए अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोरकसपणे पुढे आली आहे. अमरावतीच्या नागरिकांना हर्षदीप कांबळेंकडून अपेक्षा आहेत.