वाहनासाठी हटकल्याने महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:17 IST2021-08-21T04:17:00+5:302021-08-21T04:17:00+5:30
भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्धा ठार मोर्शी : भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार झाल्याची घटना हिरवखेड मार्गावर ...

वाहनासाठी हटकल्याने महिलेचा विनयभंग
भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्धा ठार
मोर्शी : भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार झाल्याची घटना हिरवखेड मार्गावर १८ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजतादरम्यान घडली. महिलेच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहे.
------------------------
घोडगावात वृद्धाला रॉडने मारहाण
परतवाडा : शेती व जागेच्या वादातून वृद्धाच्या पायावर रॉडने मारून जखमी केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी घोडगाव कविठा येथे घडली. रामदास कथे (५७) यांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी प्रशांत हरिदास कथे, अतुल कथे, मनोड बाबाराव डांगे व एक महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------
वाहनाची जनावराला धडक, मुलगा जखमी
नांदगाव खंडेश्वर : भरधाव वाहनचालकाने कंडक्टर साईडने जनावराला धडक दिल्याने साईडला बसलेला मुलगा जखमी झाल्याची घटना वाघोडा येथे घडली. प्रकाश विष्णू इंगळे (५५) यांच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी शिवाजी धगे (रा. बीबी ता. लोणार जि. बुलडाणा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.