शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी झाली ‘नकोशी’, कुलदीपकच हवा; ४ महिन्यांच्या चिमुकलीसह विवाहितेला घराबाहेर काढले

By प्रदीप भाकरे | Updated: November 15, 2022 17:59 IST

घटस्फोट दे, अन्यथा जाळून मारेन; सासरच्यांची धमकी

अमरावती : सासरहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावत एका विवाहितेचा अनन्वित छळ करण्यात आला. ५० हजार रुपये देऊनही दीड लाखांसाठी सासरी तिला धमकावण्यात आले. पुढे घटस्फोट दे, अन्यथा जाळून मारेन, अशी गर्भित धमकीदेखील देण्यात आली. ती छळमालिका तेवढ्यावरच थांबली नाही. तर, तिने मुलीला जन्म दिल्याने मुलगी नको, आम्हाला घराचा कुलदीपकच हवा, असे बजावत तिला तिच्या नवजात मुलीसह घराबाहेर काढण्यात आले.

बडनेरा येथील नवी वस्ती भागातील शिवाजीनगर येथे १४ फेब्रुवारी २०२१ ते २३ मार्च २०२२ या कालावधीत तिचा छळ करण्यात आला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आरोपी शेख फैजान शेख युसुफ (२७), शेख अहफाज शेट युसूफ (३५, दोन्ही रा. शिवाजीनगर, बडनेरा) व तीन महिलांविरुद्ध कौटुंबिक छळ, मारहाण, शिविगाळ व हुंडा प्रतिबंधक अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरिक्षक सोनाली मेश्राम यांनी ती तक्रार नोंदवून घेतली.

तक्रारीनुसार, लग्नाच्या काही दिवसानंतर विवाहितेला तिचा पती, भासरा व दोन महिलांनी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन ये, म्हणून शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरवात केली. म्हणून तिच्या वडिलांनी आरोपींना ५० हजार रुपये दिले. काही दिवसानंतर उर्वरीत दीड लाख रुपये आण्ण्यासाठी पाचही आरोपी तिला शिवीगाळ, मारहान करायचे व तलाक देण्याची धमकी देत होते. तलाक दिला नाही तर जाळून मारण्याची धमकी देखील तिला देण्यात आली. म्हणून तिच्या वडिलांनी तिला १४ मे २०२१ रोजी माहेरी आणले. दरम्यान, २३ नोव्हेंबर २०२१ रोजी तिला मुलगी झाली. ती बाब तिने पतीसह सासरला कळवली असता मुलगी झाल्यामुळे ते सर्व नाराज झाले. मुलगी सुखात राहावी, यासाठी तिच्या वडिलांनी जावई शेख फैजान याला पुन्हा ५० हजार रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांनी ती सासरी नांदण्यासाठी गेली.

पैसे आण, तेव्हाच घरी ये! 

सासरी परतल्यानंतर ‘मुलगा पाहिजे होता, घरचा चिराग पाहिजे होता, मुलीलाच जन्म दिला, असे टोमणे मारत तिला पाचही आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केली. माहेरहून उर्वरित एक लाख आणण्यासाठी, तिच्यावर दबाव आणण्यासाठी तिच्याकडील चांदीचे दागिने हिसकावून घेण्यात आले. १२ मार्च रोजी भांडण करुन पैसे आणशील तेव्हाच घरात ये असे म्हणून आरोपींनी तिला तिच्या लहानग्या मुलीसह घरातून हाकलून दिले. तेव्हापासून फिर्यादी महिला माहेरी राहत असून, अखेर तिने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसाDivorceघटस्फोटAmravatiअमरावतीhusband and wifeपती- जोडीदार