कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:12 IST2021-05-23T04:12:40+5:302021-05-23T04:12:40+5:30

अमरावती : बडनेरा मार्गावरील एका कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत ३८ वर्षीय परिचारिकेच्या शरीराला एका युवकाने स्पर्श करून विनयभंग केल्याची ...

Harassment of a nurse working at Covid Care Center | कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग

कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग

अमरावती : बडनेरा मार्गावरील एका कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत ३८ वर्षीय परिचारिकेच्या शरीराला एका युवकाने स्पर्श करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १७ मे रोजी घडली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी २१ मे रोजी गुन्हा नोंदविला.

पोलीस सूत्रांनुसार, किशोर विश्वनाथ महाले (३०, रा. बडनेरा रोड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहुलनगरातील रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय महिलेने बडनेरा पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. त्यावरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), ५०९ अन्वये गुन्हा नोंदविला. यासंदर्भात पीडित महिलेने येथील डॉक्टरला सदर प्रकरण सांगितली. परंतु, डॉक्टरने महिलेची या प्रकरणात कुठलेही मदत केली नसल्याचे महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्हाणे करीत आहेत.

Web Title: Harassment of a nurse working at Covid Care Center