पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:12 IST2021-04-13T04:12:52+5:302021-04-13T04:12:52+5:30

अमरावती : दोन वर्षांपासून पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी फ्रेजरपुरा ठाण्यांतर्गत उघडकीस आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून ...

Harassment of a minor girl by chase | पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अमरावती : दोन वर्षांपासून पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी फ्रेजरपुरा ठाण्यांतर्गत उघडकीस आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सिध्दार्थनगर येथील रहिवासी २१ वर्षीय तरुणाविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.

९ एप्रिल रोजी फ्रेजरपुरा हद्दीतील १६ वर्षीय मुलगी लहान भावाच्या वाढदिवसासाठी केक घेण्यास दुचाकी वाहनाने जात होती. दरम्यान मालटेकडीसमोरील रस्त्यावर आरोपी तिच्या मोपेड वाहनासमोर दुचाकी आडवी केली. वाहनाची चावी काढून तिला खोलीवर चल, असे म्हणून तिला बदनामीची आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने विरोध दर्शविला. दरम्यान मुलीच्या छेडखानीचा प्रकार पाहून तेथे उपस्थित एका व्यक्तीने आरोपीला हटकले. त्यामुळे तो तेथून निघून गेला. या घटनेनंतर पीडित मुलीने घर गाठून वडिलांना माहिती दिली. त्यानुसार वडील पीडित मुलीसोबत घेऊन फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार देण्यात पोहोचले. या घटनेचा प्राथमिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी केला. पुढील तपास महिला अधिकारी करीत आहे.

Web Title: Harassment of a minor girl by chase