माहेरहून पैशासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:14 IST2021-09-18T04:14:00+5:302021-09-18T04:14:00+5:30

क्षुल्लक कारणावरून चाकू मारला येवदा : रागाने पाहिल्याने हटकले असता, शिवीगाळ करून उजव्या दंडावर चाकू मारून जखमी केल्याची घटना ...

Harassment of a married woman for money from Maher | माहेरहून पैशासाठी विवाहितेचा छळ

माहेरहून पैशासाठी विवाहितेचा छळ

क्षुल्लक कारणावरून चाकू मारला

येवदा : रागाने पाहिल्याने हटकले असता, शिवीगाळ करून उजव्या दंडावर चाकू मारून जखमी केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी वरूड कुलट येथे घडली. गजानन रामदास जायले यांच्या तक्रारीवरून येवदा पोलिसांनी योगेश नाना पुंडकर (३०, रा. वरूड कुलट) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

गणपती मंदिराजवळून दुचाकी लंपास

अंजनगाव सुर्जी : गणपती मंदिरासमागे उभी केलेली एमएच २७ एडी ०८५५ क्रमांकाची दुचाकी लंपाक करण्यात आली. मधुकर विठ्ठल ठाकरे (७१, रा. बोराळा) यांच्या तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------

क्षुल्लक कारणावरून काठीने मारहाण

मंगरुळ चवाळा : दळण केंद्रानजीकच्या रेतीच्या ढिगाऱ्यावर बसण्याच्या कारणावरून दळण केंद्रचालकाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना गोळेगाव येथे १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. महिलेच्या तक्रारीवरून मंगरुळ चवाळा पोलिसांनी आरोपी अमरदीप पांडूरंग कुणबीथोप (रा. गोळेगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Harassment of a married woman for money from Maher