हमालपुरा येथील श्री छत्रपती व्यायाम क्रीडा मंडळाच्या जागेतील हनुमान मंदिर सतत उघडे असते. ही संधी चोरट्याने साधली. मंदिराशेजारी राहणारे शरद बावणे (४१) यांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तोंडाला रुमाल बांधलेला चोरटा निदर्शनास आला. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.
-----------------
शोभानगरातील गुंड स्थानबद्ध
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शोभानगर येथील कुख्यात गुंड विक्की ऊर्फ विक्रम ऊर्फ शूटर दामोदर अंबर्ते (२९) याच्या स्थानबद्धतेचे आदेश २८ मे रोजी काढण्यात आले. २०१२ पासून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ शशिकांत सातव व गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता.