कंटेनरमधून दीड लाखांचे पार्सल लंपास
By Admin | Updated: December 2, 2015 00:08 IST2015-12-02T00:08:33+5:302015-12-02T00:08:33+5:30
पनवेलहून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनरमधून २८ नोव्हेंबरला अकोला नाका परिसरातून दीड लाख रुपये किमतीचे पार्सल चोरीला गेले.

कंटेनरमधून दीड लाखांचे पार्सल लंपास
तक्रार : पनवेलहून नागपूरकडे जात होता माल
बडनेरा : पनवेलहून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनरमधून २८ नोव्हेंबरला अकोला नाका परिसरातून दीड लाख रुपये किमतीचे पार्सल चोरीला गेले. मात्र, याबाबत बडनेरा व लोणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या चालकाला हुसकावून लावण्यात आले. त्याने वरिष्ठांकडे दाद मागितल्यानंतर ३० नोव्हेंबरला बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आलेत.
लालबहाद्दूर गंगाधर पाल (२५, रा. डगडपूर, उत्तर प्रदेश) असे फिर्यादी कंटेनरचालकाचे नाव आहे. २५ नोव्हेंबरला एम.एच.१४-बी.जे. २६५० या कंटेनरमधून चालक १ लाख रुपये किंमतीच्या वेगवेगळ्या पार्सल्स घेऊन मुंबईमधील पनवेलहून नागपूरकडे रवाना झाला. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला नाक्यावर तो २६ नोव्हेंबरच्या रात्री १ वाजता जेवण करण्यासाठी थांबला असताना ट्रकमधील संगणक, कपड्याचे गठ्ठे, फ्रीज, वॉशिंग मशीन व इतर साहित्याच्या पार्सल्ससह १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. या घटनेची तक्रार त्याने बडनेरा पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.