संक्रमित मृतांचे अर्धशतक पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:02 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:02:00+5:30
जिल्ह्यात सोमवारी ४२ अहवाल प्राप्त झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १,७७१ झालेली आहे. या अहवालात जिल्हा ग्रामीणमध्ये माहुली जहांगीर येथील ११ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झालेला आहे.

संक्रमित मृतांचे अर्धशतक पार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : २४ तासांत सहा कोरोना संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ५३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सोमवारी ४२ अहवाल प्राप्त झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १,७७१ झालेली आहे. या अहवालात जिल्हा ग्रामीणमध्ये माहुली जहांगीर येथील ११ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झालेला आहे.
सकाळच्या अहवालात अशोकनगरात २१ वर्षीय महिला, रामपुरी कॅम्प येथे ७५ वर्षीय, न्यू आंबेडकरनगरात ५५ वर्षीय महिला व बडनेरा नवी वस्तीत ५८ वर्षीय, गोपालनगरात ७२ वर्षीय, राजापेठ येथे ४० वर्षीय, मांगीलाल प्लॉट येथे ४६ वर्षीय, बजरंगनगरात २० वर्षीय, कंवरनगरात ३७ वर्षीय, नांदगाव खंडश्वर येथे ५९ वर्षीय, वरुडा येथे २६ वर्षीय व मनीषा कॉलनीत ४४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सायंकाळच्या अहवालात बडनेरा जुनीवस्तीतील चंद्रानगरातील २६ वर्षीय, माहुली जहागीर येथे २६, ४५, ४०, ४५, २८, २०, ३२, १९,२०,२६ व ३१ वर्षीय, गोपालनगरात ५२ वर्षीय, कठोरा नाक्यावरील हरिओम कॉलनीत ३४ वर्षीय, दर्यापुरात ५२ वर्षीय, दर्यापूर तालुक्यात लेहगाव रेल्वे येथे २४ वर्षीय, चांदूर बाजार तालुक्यात करजगाव येथे २६ वर्षीय व मसानगंज येथे ७० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. रात्रीच्या अहवालात हबीबनगरात ५० वर्षीय, सूरजनगरात ५५ वर्षीय, कृष्णानगरात २७ वर्षीय, साबू ले-आऊटमध्ये ५६ वर्षीय, साबनपुऱ्यात ५१ वर्षीय, जुना कॉटन मार्केट येथे ३५ वर्षीय, म्हाडा कॉलनीत ५५ वर्षीय, व चपराशीपुरा येथे ५० वर्षीय पुरुष तसेच पाचबंगला परिसरात ३१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. बाधितांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आलेले असून, या भागात आवागमनास अत्यावश्यक कामाशिवाय मनाई करण्यात आलेली आहे.
पुन्हा तिघांचा मृत्यू
रविवारी सायंकाळी झमझमनगर येथील महिला व निषाद कॉलनीतील पुरुष तसेच सोमवारी दुपारी सिंधूनगरातील ५२ वर्षीय महिलेचा, तर रात्री सुफियाननगरातील ५६ वर्षीय महिला, बडनेरा नवी वस्तीतील ६५ वर्षीय पुरुष तसेच बडनेरा मिल परिसरातील ६० वर्षीय महिलेचा येथील कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.