वडनेर गंगाईत वादळी पावसासह गारपीट

By Admin | Updated: June 5, 2017 00:09 IST2017-06-05T00:09:03+5:302017-06-05T00:09:03+5:30

दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई व वरूड परिसराला रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला, ..

Hailstorm with windy rain in Vadnar Gangai | वडनेर गंगाईत वादळी पावसासह गारपीट

वडनेर गंगाईत वादळी पावसासह गारपीट

सर्वेक्षणाची मागणी : वाहतुकीला अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
येवदा : दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई व वरूड परिसराला रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला, तर काही ठिकाणी बोराच्या आकाराची गारपीट झाली व काहींच्या घरावरील टीनपत्र उडाल्याने नागरिक तारांबळ उडाली.
वडनेर गंगाई परिसरात सायंकाळी ७ वाजतादरम्यान वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस कोसळला. यामुळे अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडून अस्तव्यस्त पडले. तसेच दर्यापूर-आकोट रस्त्यावर अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने काही वेळेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. येथील आठवडी बाजारात मांस विक्री करताना राजू रावेकर यांचा अंगावर झाडाची फांदी पडल्याने जखमी झाले. सदर घटनेची पाहणी करण्याकीरता सरपंच दिनक देशमुख व सदस्य व गावातील नागरिक यांनी नुकसान झालेल्या घटनेची पाहणी केली. झाडे कोसळल्याने गावामधील वीजपुरवठा काही वेळेपुरता खंडित झाला होता. या वादळी पावसामुळे नुकसानग्रस्तांच्या घरांची पाहणी तहसीलदार अमोल कुंभार यांनी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Hailstorm with windy rain in Vadnar Gangai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.