‘व्हॅलेंटाईन्स डे’निमित्त देशभक्तांना सलाम
By Admin | Updated: February 15, 2015 00:02 IST2015-02-15T00:02:37+5:302015-02-15T00:02:37+5:30
विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी व्हलेंटाईन डे निमित्त शनिवार १४ फेब्रुवारी रोजी ...

‘व्हॅलेंटाईन्स डे’निमित्त देशभक्तांना सलाम
अमरावती : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी व्हलेंटाईन डे निमित्त शनिवार १४ फेब्रुवारी रोजी भारतीय संस्कृतीचे उल्लंघन न करता भारतिय संस्कृतीचे जतन करण्यासाठी देशभक्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या शहिदांना इर्विन चौक येथील शहीद स्तंभावरील शहिदांना सलाम करीत त्याच्या कार्याची जाण विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे तरुण-तरुणींनी अभिनव उपक्रमाव्दारे करून दिली.
शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त भारतीय संस्कृतीचे उल्लंघन होईल, असे कृत्य न करता या दिवसानिमित्त तरूण-तरूणींनी १४ फेब्रुवारी १९३१ ला महान देशभक्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या तरूण रक्ताची, त्याच्या बलिदानाच्या त्यागाची आठवण करून या महान क्रांतिकारकांना विश्र्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने शहिदाना सलाम करीत श्रध्दांजली अर्पण केली. या अभिनव उपक्रमानिमित्त विश्र्वहिंदू परिषदेचे महानगर प्रमुख अरूण मोंढे यांच्या उपस्थितीत शहिदस्तंभा समोर थोर क्रांतिकार यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अरूण मोंढे यांनी आपले विचार मांडताना ते म्हणाले व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारे कुठलेही असभ्य वर्तन होऊ नये यासाठी पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी असे प्रकार रोखणे काळाची गरज आहे. नागरिकांनीही सहकार्याच्या भावनेतून असे प्रकार घडू नये याची काळजी घेण्याचे आवाहन करीत भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी क्रांतिकारकांना श्रध्दांजली अर्पण करून व्हॅलेंटाईन डे तरूण- तरूणींनी पाडावी असे आवाहनदेखील त्यांनी केले. कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष अरूण मोंढे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक प्रवीण गिरी, शहर संयोजक निरंजन दुबे, दुर्गा वाहिनीच्या शहर संयोजिका मनिष्का डबरे, मातृशक्तीच्या शहरप्रमुख भावना कुदळेॉ, संगीता शिंदे, रोहित कोठार, कुणाल देवासे, इंद्रकांत तिवारी, पवन श्रीवास, सत्यजित दुबे, विपीन गुप्ता, आकास ठाकुर, शेखर सयाम, त्रिदेव डेडवाल, विश्र्वजीत दुबे, श्रेयस चिम, अर्जुन दिघडे, विक्की चवरे तसेच विश्र्वहिंदु परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)