गारपिटीमुळे ६६२ हेक्टर क्षेत्र बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:07 IST2018-04-20T22:07:34+5:302018-04-20T22:07:34+5:30
जिल्ह्यात रविवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे चांदूरबाजार तालुक्यातील ६६५ शेतकऱ्यांच्या ६६५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाले. या विषयीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला.

गारपिटीमुळे ६६२ हेक्टर क्षेत्र बाधित
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात रविवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे चांदूरबाजार तालुक्यातील ६६५ शेतकऱ्यांच्या ६६५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाले. या विषयीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला.
जिल्ह्यात १५ एप्रिल रोजी अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी, विठ्ठलापूर, विनापूर, गौरखेडा आदी गावांत संत्रा, गहू, कांदा, केळी व ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्याच्या महसूल यंत्रणाद्वारा बाधित पिकांच्या नुकसानीचा अहवाल सादर केला. याच आपत्तीमध्ये माधान येथील साहेबराव भागवत यांच्या मालकीची गाय मृत झाली. जमापूर तेथील सलीमशहा दिलबर शाह यांचे घराचे छप्पर वादळाने उडाल्याने संसार उघड्यावर आला. आपत्तीबाधितांना मदत देण्याची मागणी होत आहे.