चपराशीपुरा चौकात मोकाट श्वानांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST2021-01-23T04:12:34+5:302021-01-23T04:12:34+5:30

अमरावती : येथील विश्रामगृह ते पराशीपुरा चौक दरम्यान मोकाट श्वानांचे कळप रहदारीच्या मार्गावर झोपून राहत असल्याने सुसाट येणाऱ्या वाहनांना ...

Hados of Mokat dogs at Chaprashipura Chowk | चपराशीपुरा चौकात मोकाट श्वानांचा हैदोस

चपराशीपुरा चौकात मोकाट श्वानांचा हैदोस

अमरावती : येथील विश्रामगृह ते पराशीपुरा चौक दरम्यान मोकाट श्वानांचे कळप रहदारीच्या मार्गावर झोपून राहत असल्याने सुसाट येणाऱ्या वाहनांना अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

-------------------

जिल्हा कचेरीचा रस्ता केव्हा होणार दुरुस्त?

अमरावती : कॅम्प ते जिल्हा कचेरी व पुढे बियाणी चौकाकडील वर्दळीच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून नियमित ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना हादरे बसून कमरेची त्रास वाढू लागला असून, वाहनदेखील खिळखिळे होऊ लागले आहे. हा मार्ग तातडीने दुरुस्तीची मागणी नागरिकांद्वारा होत आहे.

---------------------------

तहसील कार्यालयातील गर्दी ओसरली

अमरावती : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान विविध कामानिमित्त येणाऱ्यांची मोठी गर्दी वाढली होती. मात्र, निवडणूक प्रक्रिया आटोपल्याने तहसील कार्यालयातील गर्दी ओसरल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले.

-------------------------

Web Title: Hados of Mokat dogs at Chaprashipura Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.