शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तोतया लवाद अधिकाऱ्याविरोधात उभा ठाकला जीम ट्रेनर; फसवणुकीचा गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: January 4, 2023 13:40 IST

केस चालविण्यासाठी घेतली रक्कम, अमरावतीमध्ये थाटले होते समांतर न्यायालय

अमरावती : तोतया लवाद अधिकारी सिध्दार्थ रामटेके याच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा सलग दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गाडगेनगर पोलिसांनी ३ जानेवारी रोजी उशिरा रात्री रामटेकेविरूध्द एफआयआर दाखल केला. रामटेके याने स्वत:ची लवाद अधिकारी म्हणून ओळख करून देऊन आपली सुमारे ३० हजार ६०० रुपायंनी फसवणूक केल्याचे रवींद्र जरूदे (४४, रा. रवीनगर) यांनी तक्रारीत म्हटले आहे. जरूदे हे व्यवसायाने जिम ट्रेनर आहेत.

तक्रारीनुसार, जरुदे यांनी घरगुती संबंध असणारे सुधीर थोरात यांना सन २०१६ मध्ये काही रक्कम उसनवार दिली होती. पण बराच काळ होवूनही त्याने रक्कम परत केली नाही. दरम्यान, ती रक्कम काढण्यासाठी जरूदे यांनी पंचवटी चौकस्थित लवाद न्यायाधिकरण गाठले. त्यावेळी सिध्दार्थ रामटेके याने तो स्वत: पंचवटी चौकातील लवाद न्यायाधीकरण कार्यालयाचा प्रमुख असल्याची बतावणी केली.

त्या केससाठी सुरवातीला २० हजार रुपये व केसचा निकाल लागल्यावर ५० हजार रुपये दयावे लागेल असे बोलून रामटेके याने जरूदेंकडून ३० हजार ६०० रुपये घेतले. बरेच दिवस होवूनही जरूदे यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी केस मागे घेण्याकरीताच्या दस्तऐवजासह रक्कम परत मिळण्याबाबत अर्ज केला. त्यावर रामटेके याने जरूदे यांना दोन ते तीन महिने फिरविले. ७ एप्रिल २०२१ रोजी आरोपीने जरूदे यांना त्याच्या लवाद न्यायाधिकरणात बोलावून केस मागे घेण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

अशी आहे तक्रार

आरोपी सिध्दार्थ रामटेके याच्याकडे लवाद न्यायाधिकरण चालविण्याची कोणतीही शासकीय परवानगी नसतांना त्याने स्वत:च्या आर्थिक फायदयासाठी स्वत: लवाद अधिकारी असल्याचे भासविले. लबाडीने बोलून खोटे दस्तऐवज तयार केले. फिर्यादीला पैशाची मागणी करुन केसचा लवकरात लवकर निकाल लावून देतो असे बोलून ४ मे २०२० ते १७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ३० हजार ६०० रुपये घेतले व फसवणूक केली.

येथील पंचवटी चौकात लवाद न्यायाधिकरण थाटून स्वत:ची ओळख लवाद अधिकारी म्हणून करून देणाऱ्या सिद्धार्थ रामटेके याला गाडगेनगर पोलिसांनी नोव्हेंबर २२ मध्ये अटक केली होती. सध्या तो कारागृहात आहे. गाडगेनगर पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी सिद्धार्थ रामटेके व त्याच्या एका सहकारी महिलेविरुद्ध अभय रवींद्र उके यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. लवाद न्यायालयात दाखल प्रकरणाचा निकाल एक महिन्यात लावून देतो व थकीत घरभाडेसुद्धा वसूल करून देतो, अशी बतावणी करून रामटेके व एका महिलेने त्यांच्याकडून २३ जुलै रोजी ५० हजार रुपये रोख घेतले. मात्र, काम न करता फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी नोंदविली होती.लवाद न्यायाधिकरणाच्या नावावर ज्यांची रामटेकेंकडून आर्थिक फसवणूक झाली, त्यांनी तक्रार व गुन्हा नोंदविण्यासाठी समोर यावे. यापुर्वीच्या तक्रारीेवरून रामटेकेला अटक करण्यात आली होती.

- पुनम पाटील, सहायक पोलीस आयुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीAmravatiअमरावती