कारागृहात व्यायामशाळा

By Admin | Updated: September 22, 2015 00:25 IST2015-09-22T00:25:27+5:302015-09-22T00:25:27+5:30

येथील मध्यवर्ती कारागृहात अधिकारी, कर्मचारी यांच्या सुदृढतेसाठी साकारलेल्या व्यायाम शाळेचा शुभारंभ शनिवारी उपमहानिरीक्षकांच्या हस्ते करण्यात आला.

The gym in prison | कारागृहात व्यायामशाळा

कारागृहात व्यायामशाळा

नवोपक्रम : क्रीडा अधिकारी निधीतून साकार
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात अधिकारी, कर्मचारी यांच्या सुदृढतेसाठी साकारलेल्या व्यायाम शाळेचा शुभारंभ शनिवारी उपमहानिरीक्षकांच्या हस्ते करण्यात आला. ही व्यायाम शाळा जिल्हा क्रीडा अधिकारी निधीतून साकारली आहे.
यावेळी वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी कारागृह ही बंदी शाळा असून सूर्योदय ते सूर्यास्त अशी बंदीजणांची दिनचर्या ही नित्याचीच बाब आहे. समाजात वावरत असताना हातून नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजणांमध्ये सुधारणा व पुनर्वसन करण्यासाठी अविरतपणे कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी सुदृढ राहावे, ही काळाची गरज आहे. व्यायाम शाळा ही नक्कीच कारागृहातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात हातभार लावणार, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला कारागृहाचे अधीक्षक एस. व्ही. खटावकर, उपअधीक्षक बी. एन. ढोले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नितीन क्षीरसागर, सुभेदार पवनकुमार पांडे, कारागृहातील शिक्षक बी.एम. कांबळे, ए.आर. गव्हाणे, राहुल पंधरे, उमेश राठोड, रामेश्वर मुदगुले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

देसाई हे कसाब, याकूब मेमनच्या फाशीचे साक्षीदार
मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला येरवड्यात तर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली. या घटनेचे साक्षीदार कारागृह प्रशासनाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई आहेत, हे विशेष.

Web Title: The gym in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.