चावलमंडी येथील रस्त्यांवर गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST2020-12-31T04:13:29+5:302020-12-31T04:13:29+5:30

सांडपाणी रस्त्यावर, अचलपूर नगरपालिका कुंभकर्णी झोपेत, नागरिक त्रस्त अचलपूर : शहरातील चावलमंडी भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीतील सांडपाणी ...

Gutterganga on the roads at Chawalmandi | चावलमंडी येथील रस्त्यांवर गटारगंगा

चावलमंडी येथील रस्त्यांवर गटारगंगा

सांडपाणी रस्त्यावर, अचलपूर नगरपालिका कुंभकर्णी झोपेत, नागरिक त्रस्त

अचलपूर : शहरातील चावलमंडी भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीतील सांडपाणी २४ तास रस्त्याने वाहते. घराघरांतील शौचालय, बाथरूम, नाल्यांचे पाणी तसेच पाईप लाईनच्या गळतीमुळे भर रस्त्यावर चिखल साचलेला असतो. ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

चावलमंडी येथील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये हे सांडपाणी साचते. ही अचलपूरची बाजारपेठ असून, या मुख्य रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. किराणा, भाजीपाला, दवाखाना, बँक, शाळा याच भागात आहेत. त्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांना गटाराचा सामना करावा लागतो. नगरपालिका प्रशासनाने त्वरित सोडवावी व नागरिकांना पायाभूत सुविधा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Gutterganga on the roads at Chawalmandi