खोलापूर येथे ७५ हजारांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST2021-04-11T04:13:05+5:302021-04-11T04:13:05+5:30
वाठोडा शुक्लेश्वर : स्थानिक गुन्हे शाखेने खोलापूर येथील मोहम्मद जिया उलहक मोहम्मद आरिफ (२५, रा. काझीपुरा, खोलापूर) याच्याकडे ...

खोलापूर येथे ७५ हजारांचा गुटखा पकडला
वाठोडा शुक्लेश्वर : स्थानिक गुन्हे शाखेने खोलापूर येथील मोहम्मद जिया उलहक मोहम्मद आरिफ (२५, रा. काझीपुरा, खोलापूर) याच्याकडे धाड घालून ७५ हजार ५५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ग्रामीण भागात गस्तीवर असताना, मोहम्मद जिया याने घरात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने धाड टाकून आरोपीच्या ताब्यातून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू असा एकूण ७५,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोहम्मद जिया याला खोलापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष चौधरी, कर्मचारी संतोष मुंदाने, पुरुषोत्तम यादव, दिनेश कनोजिया, पंकज फाटे, चालक संदीप नेवारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
--------------