कारमधून ५.२७ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:37+5:302021-02-05T05:23:37+5:30

बेनोडा येथील कारवाई : दोन आरोपींना अटक बेनोडा : स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका कारमधून ५.२७ लाख रुपयांचा प्रतिबंधित ...

Gutka worth Rs 5.27 lakh seized from car | कारमधून ५.२७ लाखांचा गुटखा जप्त

कारमधून ५.२७ लाखांचा गुटखा जप्त

बेनोडा येथील कारवाई : दोन आरोपींना अटक

बेनोडा : स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका कारमधून ५.२७ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. बेनोडा पोलीस ठाण्यासमोर ३० जानेवारीला सकाळी १० ते ११च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळाहून दोन आरोपींसह कार, गुटखा, मोबाईल असा एकूण ९ लाख ३८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. मो. शफिक मो. रशीद (वय ३५) व अफसर खान गुलशेर खान (४०, दोन्ही रा. मोर्शी) यांना अटक करण्यात आली.

पीएसआय दिलीप श्रीराव यांच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविचे कलम

१८८, २७२, २७३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. बेनोडा पोलिसांनी शनिवारी नाकाबंदीदरम्यान एमएच ०४ एफए ८५८४ या चारचाकी वाहनाची झडती घेतली. त्यात प्रतिबंधित सुगंधित गुटखा मिळून आला. कारसह गुटखा जप्त करण्यात आला. या घटनेचा एएसआय दिलीप वासनकर करीत आहेत. ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या नेतृत्वात पीएसआय दिलीप श्रीराव, जमादार दिवाकर वाघमारे, नापोकाँ संतोष औंधकर, अंकेश वानखडे, सचिन भोसले यांनी ही कारवाई केली.

--------------------------

Web Title: Gutka worth Rs 5.27 lakh seized from car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.