वर्षभरात २२ लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: September 6, 2014 01:28 IST2014-09-06T01:28:15+5:302014-09-06T01:28:15+5:30
राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना देखील इतर राज्यांच्या सीमेमधून अमरावतीत गुटख्याची तस्करी होते. अन्न व औषधी प्रशासनाने जिल्ह्यात केवळ एका वर्षात २२ लक्ष रूपयांचा गुटखा जप्त केला.

वर्षभरात २२ लाखांचा गुटखा जप्त
संदीप मानकर अमरावती
राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना देखील इतर राज्यांच्या सीमेमधून अमरावतीत गुटख्याची तस्करी होते. अन्न व औषधी प्रशासनाने जिल्ह्यात केवळ एका वर्षात २२ लक्ष रूपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईवरून गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
गणेशोत्सवादरम्यान विक्री केली जाणाऱ्या भेसळयुक्त खव्याच्या मिठाई व प्रसदावरही यंदा एफडीएची करडी नजर राहणार आहे. देशातील २७ राज्यांत व चार केंद्रशासित प्रदेशात गुटखाबंदीचे आदेश लागू असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची व गुटखाजन्य पदार्थांची विक्री होत आहे. २० जुलै २०१३ ते १५ जुलै २०१४ पर्यंत अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या केलेल्या कारवाईत २२ लाख ५ हजार १२ रूपयांचा गुटखा जिल्ह्यात जप्त करण्यात आला. गुटखा जप्तीची कारवाई एकीकडे सुरु असताना दुसरीकडे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गुटख्याची दामदुप्पट भावाने विक्री सुरु आहे.
शहरात गुटखा कोणत्या मार्गाने येतो हे कुणीही सांगत नाहीत. परंतु शहरातील सर्व पानविक्रेत्यांकडे अधिक दराने गुटखा विक्री होतो. अन्न सुरक्षा मानद कायदा २००६ अधिनियम २०११ नुसार गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येते. अन्न सुरक्षा आयुक्त मुंबई यांनी २० जुलै २०१४ पासून पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी गुटखा बंदी प्रतिबंधाचे आदेश जारी केले आहेत. ही कारवाई अन्न व सुरक्षासह आयुक्त सुरेश देशमुख व सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांनी केली.