गुरुसिद्धी संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:34+5:302021-07-27T04:13:34+5:30
तिवसा : गुरुपौर्णिमेनिमित्त तिवस्याच्या गुरुसिद्धी संगीत विद्यालयात अकोला येथील संगीत अभ्यासक देवेंद्र देशमुख यांनी शास्त्रीय संगीताची बहारदार मैफील ...

गुरुसिद्धी संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव
तिवसा : गुरुपौर्णिमेनिमित्त तिवस्याच्या गुरुसिद्धी संगीत विद्यालयात अकोला येथील संगीत अभ्यासक देवेंद्र देशमुख यांनी शास्त्रीय संगीताची बहारदार मैफील सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण साबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून अरविंद वाघमारे, दूरदर्शन कलावंत तथा तबलावादक सौरभ कर्डीकर, राष्ट्रीय कीर्तनकार नितीन कुबडे, हेमंत मुंदाने, अनिल चौधरी, संगीत विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बलदेवराव इंगाले आदी उपस्थित होते. नितीन कुबडे यांनी दीपप्रज्वलन केले. हार्मोनियमवर स्नेहांशु हेंडवे, तबल्यावर सागर मिरासे, व्हायोलिनवर धार्मिक इंगोले, मृदंगावर ऋषीकेश पचारे, बासरीवर यशवंत खोडे, ऑक्टोपॅडवर उपदेश इंगाले, तर गायनात मोहित अडसडे, सम्यक तेलमारे, शिवानी कडू, निशिका डहाके, राधिका धडांगे, आसावरी, भैरवी, मधुवंती पुनसे, अनुश्री व साक्षी वऱ्हाडे, समृद्धी मुळे, देवांशु खोडे, सार्थक विघ्ने, कुणाल काळे, संप्रदा वानखडे, हार्दिक निंघोट, दुर्वा तिवारी, कणक महल्ले, रुद्रआदित्य तायवाडे, प्रणम्य शिंदे आदी चिमुकल्यांनी कलेचे सादरीकरण केले. प्रणव कुबडे यांनी स्वतंत्र तबलावादन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन आणि भैरवी घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. संचालन उषा सावरकर व आभार प्रदर्शन पार्वती इंगोले यांनी केले. सुनील इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडले.