गुरुजींची अडचण : पुढारी, नेत्यांमध्ये वाढली नियमांची धास्ती

By Admin | Updated: September 27, 2014 00:56 IST2014-09-27T00:56:32+5:302014-09-27T00:56:32+5:30

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत असून दरम्यान ताकसुध्दा फुंकून पीत आहेत.

Guruji's difficulty: Leaders, leaders are scared of increased rules | गुरुजींची अडचण : पुढारी, नेत्यांमध्ये वाढली नियमांची धास्ती

गुरुजींची अडचण : पुढारी, नेत्यांमध्ये वाढली नियमांची धास्ती

जितेंद्र दखणे अमरावती
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत असून दरम्यान ताकसुध्दा फुंकून पीत आहेत.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो यासाठी मागील महिन्यापासून सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याच क्षणापासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. साहजिकच राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह, अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही बंधने आली. ती आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार असल्याचे सर्वजण या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी घतली जात आहे. ग्रामीण भागात आदर्श आचारसंहितेची सखोल माहिती नसल्याने विविध कार्यक्रमांत जावे की नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही पडला आहे. कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साहेबांना येता येते का? याची चौकशी कार्यकर्ते करीत आहेत. या कालावधीत उमेदवार नेत्यासह सर्वच मोठ्या नेत्यावर आयोगाच्या कर्मचाऱ्यांची नजर असते. नेते मंडळीसुध्दा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याअगोदर खातरजमा करुनच कार्यक्रमास सहभागी होताना दिसत आहेत. एरवी राजकीय नेते पदाधिकारी यांच्याशी सलोख्याने वागणारे अधिकारीही कारवाईच्या धास्तीने या लोकांपासून दूरच राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये अधिक गोची राजकीय पक्षांशी निगडित संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची होत आहे. बऱ्याच निवडणुकीत शिक्षक संघटना कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी निगडित आहेत. त्यांना मात्र एकीकडे आयोगाची धास्ती, दुसरीकडे साहेबांच्या परीक्षेच्या वेळीच त्यांना मदत करता येत नाही. त्यामुळे ते द्विधा मनस्थितीत आहेत. आजही ग्रामीण भागात गुरुजींचा शब्द प्रमाण मानला जातो. पण आदर्श आचारसंहितेमुळे शासकीय सेवेत असणाऱ्या गुरुजींची मोठी अडचण होताना दिसत आहे.

Web Title: Guruji's difficulty: Leaders, leaders are scared of increased rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.