शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

शाळेत गुरुजींची 25 टक्केही हजेरी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 5:00 AM

कोरोनाकाळात शिक्षण ‘लॉक’ आहे. आता तरी शाळा सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, मध्यंतरी महसूल खात्याने शिक्षकांची वेगवेगळ्या जबाबदारी हाताळण्यासाठी कर्तव्यावर नेमणूक केली होती. दरम्यान, वाईन शॉपीवरही गुरुजींची नोंदणी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आल्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर उमटला होता. महसूल, पोलिसांच्या मदतीसाठी शिक्षकांची नियुक्ती झाली होती.

ठळक मुद्देकाही शाळांमध्ये कागदावरच शिक्षकांची कामे, ऑनलाईन शिक्षणाबाबत तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे. मात्र, शासनाने शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक केले आहे. असे असले तरी काही शाळांमध्ये शिक्षकांची हजेरी कागदोपत्रीच होती. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने गुरुजींचे चांगभलं असे चित्र आहे.कोरोनाकाळात शिक्षण ‘लॉक’ आहे. आता तरी शाळा सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, मध्यंतरी महसूल खात्याने शिक्षकांची वेगवेगळ्या जबाबदारी हाताळण्यासाठी कर्तव्यावर नेमणूक केली होती. दरम्यान, वाईन शॉपीवरही गुरुजींची नोंदणी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आल्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर उमटला होता. महसूल, पोलिसांच्या मदतीसाठी शिक्षकांची नियुक्ती झाली होती. मात्र, असे असले तरी ७० टक्के गुरुजींनी कोरोना काळात बसूनच वेतन घेतले, असे वास्तव आहे. ना ऑनलाईन शिकवणी, ना ऑनलाईन अभ्यासक्रम असा सुखद काळ काही शिक्षकांचा गेला, यात दुमत नाही. आता संचारबंदीत शिथिलता आली असून, शाळासुरू करण्यासंदर्भात नियोजन आखले जात आहे. १५ जूनपासून मराठवाड्यातील शाळा ऑनलाईन सुरू झाल्या आहेत. या भागात गुरुजींना ऑनलाईन शिक्षणाची कामे करावी लागत आहे. २६ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू होण्याचे संकेत असून, ऑनलाईन शिक्षणाला प्रारंभ होईल.

शिक्षक काय म्हणतात?

कोरोनाकाळातही शाळा सुरूच होती. ऑनलाईन शिक्षक अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांचे अध्यापन करावे लागले. केवळ कठोर संचारबंदीच्या काळातच शाळेत जाता आले नाही. एरव्ही शाळेचे कामकाज निरंतर होते.- सुरेश माेलके, शिक्षक

ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणे, अभ्यासातील अडचणी सोडविणे ही कामे करावीच लागली. विद्यार्थ्यांविना शाळा असल्या तरी अन्य कामांपासून शिक्षकांची सुटका नाही.- वैशाली परतेकी, शिक्षिका

 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण