गुरुदेवभक्तांनी घेतला गोपालकाल्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 22:15 IST2017-10-12T22:14:56+5:302017-10-12T22:15:07+5:30
राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात ११ आॅक्टोबरला हजारो भाविकांच्या उपस्थितीत गोपालकाल्याचा कार्यक्रम पार पडला.

गुरुदेवभक्तांनी घेतला गोपालकाल्याचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज मोझरी : राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात ११ आॅक्टोबरला हजारो भाविकांच्या उपस्थितीत गोपालकाल्याचा कार्यक्रम पार पडला. राष्टÑसंतांचे क्रांतिकारक अभंग व ‘पुंडलिक वरदाऽऽ हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेवऽऽ तुकाराम’च्या गजरात राष्टÑसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवात हजारो आबालवृद्धांनी गोपालकाल्याचा लाभ घेतला.
नारायणदास पडोळे महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष एस.एन. सुब्बाराव यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला उपाध्यक्ष पुष्पा बोंडे, राजे विश्वजित किरदत्त, प्रल्हाद देशमुख, हरिभाऊ वेरूळकर, खोडे महाराज, अंबादास महाराज, अ. भा. श्रीगुरूदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचार प्रमुख दा.श्रा. पाटील, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, माजी खासदार विजय मुडे, लक्ष्मणदास काळे महाराज, बाबासाहेब आवारे, रघुनाथ वाडेकर, ज्ञानेश्वर मुडे, घनश्याम पिकले, सूर्यप्रकाश जयस्वाल, सहजानंद कडू, कान्ताप्रसाद मिश्रा, भानूदास कराळे, दिलीप कोहळे, विलास साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नारायणदास पडोळे यांनी भाष्कर इंगळकर, भाष्कर काळे, साहेबराव कन्हेरकर, रघुनाथ कर्डीकर, डॉ. श्रीकृष्ण दळवी, राजेंद्र कठाळे आदींच्या संगतीने गोपालकाल्याचे कीर्तन केले.
यावेळी गोपालकाल्याचा प्रसाद घेण्यासाठी गुरूदेवभक्तांसह आसपासच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक गुरुकुंजात उपस्थित झाले होते. अत्यंत नियोजनबद्ध केलेल्या गोपालकाल्याच्या वाटपात प्रत्येकापर्यंत गोपालकाला पोहचावा, अशी तरतूद संयोजकांनी केली होती. कार्यक्रमाचा शेवट ‘आरती राष्टÑसंता। जगद्गुरू कृपावंता’’ या महाआरतीनंतर गोपालकाल्याचे वितरण करण्यात आले. गोपालकाल्याचा समारोप राष्टÑवंदनेने झाला.