पालकमंत्र्यांनी टपरीवर घेतला चहाचा आस्वाद

By Admin | Updated: December 23, 2016 00:18 IST2016-12-23T00:18:15+5:302016-12-23T00:18:15+5:30

थंडीच्या दिवसांत गरमागरम चहाची टपरी दिसल्यावर कुणाचे मन आकृष्ट होणार नाही.

The Guardian took the tea on the trip | पालकमंत्र्यांनी टपरीवर घेतला चहाचा आस्वाद

पालकमंत्र्यांनी टपरीवर घेतला चहाचा आस्वाद

पथ्रोट दौरा : चहावाल्या विनोदला मिळाली चार कटची शंभरी
नरेंद्र जावरे  परतवाडा
थंडीच्या दिवसांत गरमागरम चहाची टपरी दिसल्यावर कुणाचे मन आकृष्ट होणार नाही. पण, दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांनाही टपरीवर चहा घेण्याचा मोह झाला आणि कोणतीही भीड न बाळगता त्यांनी टपरीवर जाऊन चहाचा चक्क आस्वाद घेतला. त्यांचे सहकारी आणि उपस्थित नागरिक एका पालकमंत्र्यांचा हा साधेपणा पाहून अचंबित झाले ते वेगळेच. अचलपूर तालुक्याच्या पथ्रोट दौऱ्यावर असलेले पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे हे वेगळे रूप बुधवारी सायंकाळी ७ वाजता अनेकांनी पाहिले.
पालकमंत्री, बांधकाम व खनीकर्म राज्यमंत्री असल्याने प्रवीण पोटे यांच्या दिमतीला पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि सर्वच विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज. एका आदेशावर कोणतेही काम होईल, अशी स्थिती. मात्र, या सर्व थाटमाटाला फाटा देत पालकमंत्री प्रवीण पोटेंनी सर्वसामान्य माणसाप्रमाणे चहाच्या टपरीवर जाऊन चहा घेण्याची हौस भागवून घेतली आणि आपण अजूनही जमिनीवरच आहोत, याचा परिचय दिला. बुधवारी पथ्रोट येथील विविध कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यासाठी पालकमंत्री कामांचा व्याप असल्याने तब्बल तीन तास उशिरा आले.

चार कट शंभरची नोट
पथ्रोटमध्ये आल्यावर आर्यसमाज बसस्थानक रस्त्यावर विकासकामांचे लोकार्पण प्रवीण पोटे यांनी केले. शेजारीच असलेल्या विनोद मेश्राम यांच्या सह्याद्री टी-स्टॉलकडे पालकमंत्र्यांची नजर गेली. फलकाचे अनावरण करताच सरळ पालकमंत्री सह्याद्रीवर गेले. विनोद मेश्रामला चहा मागितला. पालकमंत्र्यांच्या सोबत असलेले मेळघाटचे आ. प्रभुदास भिलावेकर, जिल्हा सरचिटणीस गजानन कोल्हे, तालुकाध्यक्ष सुधीर रसे यासर्वांनीन चहाचा आस्वाद घेतला. पालकमंत्र्यांनी खिशातून शंभर रुपयांची नोट काढून विनोद मेश्राम यांना दिली आणि पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.

आणि बेपत्ता
आमदार दिसले
मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना सुद्धा आमंत्रित केले होते. आ. भिलावेकर येणार का, हा प्रश्न पथ्रोट गावामध्ये औत्सुक्याचा विषय ठरला होता. मात्र, बुधवारी प्रभुदास भिलावेकर यांचे आगमन होताच परिसरात चर्चेला उधाण आले होते. कारण मेळघाट मतदारसंघात आ. भिलावेकर कधी दिसतच नसल्याची बोंब आहे. मात्र, ते काहीही असले तरी यानिमित्ताने का होईना पथ्रोटवासियांना आ. प्रभुदास भिलावेकरांचे दर्शन झाले, एवढे मात्र निश्चित. यामुळे निवडणुकीची चाहुल लागली.

Web Title: The Guardian took the tea on the trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.