पालकमंत्री पोटे तीन दिवस जिल्ह्यात
By Admin | Updated: November 6, 2016 00:10 IST2016-11-06T00:10:38+5:302016-11-06T00:10:38+5:30
पालकमंत्री प्रवीण पोटे रविवार ६ ते ८ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात आहेत. रविवारी सकाळी ६.४५च्या सुमारास ते त्यांच्या मुंबईस्थित निवासस्थानावरून विमानतळाकडे प्रयाण करतील.

पालकमंत्री पोटे तीन दिवस जिल्ह्यात
अमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे रविवार ६ ते ८ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात आहेत. रविवारी सकाळी ६.४५च्या सुमारास ते त्यांच्या मुंबईस्थित निवासस्थानावरून विमानतळाकडे प्रयाण करतील. ते दुपारी १२ च्या सुमारास अमरावतीत पोहोचतील. कॅम्प मार्गावरील त्यांच्या संपर्क कार्यालयात अभ्यागतांच्या भेटी घेणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता पालकमंत्री मोटारीने वर्धेकडे प्रयाण करणार असून तेथून पुढे २ वाजताच्या सुमारास ते यवतमाळला जाणार आहेत. यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात दोन तास त्यांचा वेळ राखीव असून, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते राठीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेटणार आहेत.
मंगळवार ८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता मोर्शी तालुक्यातील काटसूर येथे जलयुक्त शिवार भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती लावून ते पुढे मोर्शी तालुक्यातील पातुर येथे रवाना होतील. तेथेही पालकमंत्र्यांच्या हस्ते जलयुक्त शिवार योजनेचे भूमिपूजन होणार आहे. दुपारी २.४५ वाजता अमरावतीत आल्यानंतर स्थानिक विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील. कार्यक्रम आटोपल्यानंतर राठीनगर येथून शासकीय वाहनाने बडनेराकडे प्रयाण करून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होतील.