पालकमंत्र्यांनी घेतला गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:12 IST2021-02-07T04:12:17+5:302021-02-07T04:12:17+5:30

उन्हाळ्यातील पाणीटंचाई : नियोजनाचे आदेश तिवसा : पालकमंत्री तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दुपारी पंचायत समितीच्या ...

Guardian Minister reviews village wise water scarcity | पालकमंत्र्यांनी घेतला गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा

पालकमंत्र्यांनी घेतला गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा

उन्हाळ्यातील पाणीटंचाई : नियोजनाचे आदेश

तिवसा : पालकमंत्री तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दुपारी पंचायत समितीच्या कार्यालयात संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेत उपाययोजनांचे आदेश दिलेत. अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेऊन त्याबाबत सर्व समस्या तात्काळ निकाली काढण्याची सूचना त्यांनी केली.

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत तिवसा तहसीलदार, बीडीओंसह सर्व ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला कृषी वीज धोरण २०२० ची सविस्तर माहिती उपकार्यकारी अभियंता उज्ज्वल गावंडे यांनी यावेळी दिली. तिवसा तालुक्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी आतापासून नियोजन करा, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. बैठकीला पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, उपसभापती शरद वानखडे, खंडविकास अधिकारी चेतन जाधव, तहसीलदार वैभव फरतारे, रवि महाले, जि.प. सभापती पूजा आमले, पंचायत समिती सदस्य कल्पना दिवे, रोहिणी पुनसे, सत्तार मुल्ला उपस्थित होते.

Web Title: Guardian Minister reviews village wise water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.