४० प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्र्यांचा दिलासा
By Admin | Updated: February 19, 2015 00:24 IST2015-02-19T00:24:20+5:302015-02-19T00:24:20+5:30
नांदगाव पेठ येथील सोफिया वीज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. या प्रकल्पग्रस्तांनी नोकरीत सामावून घेण्याकरिता आंदोलनाचा इशारा दिला होता.

४० प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्र्यांचा दिलासा
अमरावती : नांदगाव पेठ येथील सोफिया वीज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. या प्रकल्पग्रस्तांनी नोकरीत सामावून घेण्याकरिता आंदोलनाचा इशारा दिला होता. याची पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दखल घेत तातडीने इंडिया बुल्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांचे मुद्द्यांवर चर्चा केली. यानंतर ४० प्रकल्पग्रस्तांना इंडिया बुल्स कंपनीत सामावून घेण्याचा निर्णय या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने घेतला आहे.
नांदगाव पेठ परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर कोट्यवधी रूपयांचा सोफिया प्रकल्प उभारला आहे. त्या प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने केली. त्यानंतरही त्याची दखल घेण्यात आली नव्हती. म्हणून प्रकल्पग्रस्तांनी पालकमंत्री पोटे यांचे निवासस्थानासमोर १८ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. यांची दखल घेत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी इंडिया बुल्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्याबाबत विस्तृत चर्चा केली. यानुसार प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या निकाली काढण्याची हमी पोटे यांनी दिली. याशिवाय ४० प्रकल्पग्रस्तांना येत्या १५ मार्चपर्यंत नोकरीत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे नियोजित आंदोलन स्थगित केले आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे आणि जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या प्रयत्नाने प्रकल्पग्रस्तांचा तिढा तूर्तास सुटल्याने प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे आभार मानले. यावेळी प्रकल्पग्रस्त (प्रतिनिधी)