कापसाच्या कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांमध्ये वाढला असंतोष

By Admin | Updated: January 5, 2015 22:56 IST2015-01-05T22:56:06+5:302015-01-05T22:56:06+5:30

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक होत असून शेतमालाच्या बाजारभावात घसरण होत आहे़ ेशासनाने ६ हजार रूपये प्रतिक्विंटल भाव देऊन शेतकऱ्याला जीवदान द्यावे़

Growth among farmers due to Kathmola's brother's reluctance | कापसाच्या कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांमध्ये वाढला असंतोष

कापसाच्या कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांमध्ये वाढला असंतोष

वरूड : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक होत असून शेतमालाच्या बाजारभावात घसरण होत आहे़ ेशासनाने ६ हजार रूपये प्रतिक्विंटल भाव देऊन शेतकऱ्याला जीवदान द्यावे़ अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कापूस उत्पादकांनी दिला आहे.
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक होत आहे. दिवसेंदिवस शेत मालाच्या भावात घसरण होत आहे़ कधी निसर्गाचा कोप तर शासनाची उदासीनता यामध्ये शेतकरी भरडला जात आहे़ व्यापाऱ्यांची लुटमार होत असताना केवळ नोकरदार आणि व्यापाऱ्यांचे हित जोपासणारे शेतकरी विरोधी शासनकर्ते नाकर्ते झाल्याने शेतमालाला आधारभूत किंमत मिळत नाही़ तर एकरी सहा ते ७ हजार रूपये खर्च असताना उत्पादन घटल्याने एकराला एक ते दोन क्विंटल कापसाचे तर सोयाबीनचे एक क्विंटल उत्पादन निघाले, शेतकऱ्यांना लागवड खर्च काढणे दुरापास्त झाले आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा बोझा वाढत आहे. कापूस उत्पादकांना कापडसुध्दा मिळत नाही. नोकरदारांना आलिशान बंगले आणि वाहनांत वावरतांना पाहून ेशतकऱ्यांची काळीजही पेटायला लागले आहे. अशा परिस्थतीत शेतकऱ्यांनी मरावे कि जगावे हा प्रश्न निर्माण झाला. यामुळे शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव द्यावा, अन्यथा कापूस उत्पादकांना आंदोलनशिवाय पर्याय राहणार नाही

Web Title: Growth among farmers due to Kathmola's brother's reluctance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.