यशोमतींचा स्वभाव न आवडल्याने मैदानात
By Admin | Updated: September 13, 2014 00:49 IST2014-09-13T00:49:07+5:302014-09-13T00:49:07+5:30
यशोमती ठाकूर यांच्यासाठी मी १० वर्षे काम केले; तथापि त्यांचा स्वभाव न आवडल्यामुळे मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, ...

यशोमतींचा स्वभाव न आवडल्याने मैदानात
अमरावती : यशोमती ठाकूर यांच्यासाठी मी १० वर्षे काम केले; तथापि त्यांचा स्वभाव न आवडल्यामुळे मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका यशोमती यांच्या धाकट्या बहीण संयोगिता नाईकनिंबाळकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत मांडली.
यशोमतींसारखी बहीण असल्याचा मला गर्व आहे, असे सांगत फिरणाऱ्या संयोगितांनी आज यशोमतींविरुद्ध अनेक आरोप केलेत.
तिवसा तालुक्यातील सातरगाव येथील रहिवासी असण्याबाबतचे आवश्यक ते पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्यात आली असतानासुद्धा यशोमती यांच्या राजकीय दबावामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध निकाल दिला, असा आरोप संयोगिता यांनी केला. नाईकनिंबाळकर हे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी नसल्यामुळे त्यांना दिलेला रहिवासी दाखल उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीअंती रद्द ठरविला, हे येथे उल्लेखनीय.
सातरगावचे पं.स.सदस्य चंद्रशेखर ठाकूर यांच्या निवासस्थानी मी भाड्याने राहते. तसा भाडेकरारदेखील करण्यात आला आहे, अशी माहिती संयोगिता यांनी यावेळी दिली. मागणी करूनही त्यांनी
तहसीलदारांनी नोंदविले बयाण
अमरावती : कराराच्या प्रती मात्र पत्रकारांना वितरीत केल्या नाहीत. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चंद्रशेखर ठाकूर यांच्या घरी तहसीलदार, तलाठी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी पोहचलेत. या अधिकाऱ्यांसोबत आलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी संयोगिता निंबाळकर येथे राहतात का, अशी विचारणा केली. त्या येथे राहतात, असे सांगण्यात आले. सोनाली ठाकूर यांना अर्वाच्य शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. कमलाकर वाघ यांच्यासह तीन जणांविरुद्ध सोनाली ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली, अशी माहिती संयोगिता यांनी दिली. तहसीलदारांनी नियमबाह््यरीत्या घरमालक महिलेचे खोटे बयाण नोंदविल्याचा आरोप संयोगिता यांनी केला. तहसीलदारांच्या अशा वागणुकीची तक्रार का केली नाही, या प्रश्नावर मात्र संयोगिता यांच्याकडे उत्तर नव्हते. यशोमती या राजकीय लाभासाठी ठाकूर या नावाचा वापर करीत असून त्यांनी ‘यशोमती राजेश सोनवणे’ या नावाने राजकारण करावे, असे आव्हान संयोगिता यांनी यशोमतींना दिले.
- अन् त्या गोंधळल्या
दहा वर्षांपासून मी येथील रहिवासी आहे. सातत्याने विकासकामे केलीत, असे सांगणाऱ्या संयोगिता यांना विकासकामांची माहिती विचारण्यात आली त्यावेळी त्यांचा चेहरा कसानुसा झाला होता. या उमेदवारीशी इंडियाबुल्सचा काही संबंध आहे काय, या गंभीर प्रश्नावर 'मला बोलायचे नाही,' असे उत्तर संयोगिता यांनी दिले. 'वेळ आल्यावर सांगू', 'यावर मला बोलायचे नाही', 'ते मी सांगणार नाही', अशी उत्तरे संयोगितांना वारंवार द्यावी लागली. पत्रपरिषदेला शंतनू देशमुख, चंद्रशेखर ठाकूर, आंनद शर्मा, सुरजसिंह राठोड हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)