शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

11 तालुक्यांतील भूजल स्थिती जेमतेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

जिल्ह्यात डिसेंबरपर्यत ९३१.० मिमीच्या तुलनेत ८७८.७ मिमी पाऊस झालेला आहे. ही ९४.३ टक्केवारी आहे. यात सर्वाधिक ८८४.७ मिमी म्हणजेच सरासरीच्या १३२.६ मिमी पाऊस दर्यापूर तालुक्यात, तर सर्वात कमी पाऊत मेळघाटात झालेला आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ७५२.२ मिमी (६७.५ टक्के)व चिखलदरा तालुक्यात ८४३.२ मिमी ( ५६.९ टक्के) पाऊस झाला.

ठळक मुद्देभातकुली, चांदूर रेल्वे, चांदूर बाजारात १.२० मीटर वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार वर्षांत प्रथमच १० तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात भूजलस्थिती खालावलेली नाही. मात्र, भूजलस्थिती इतकीही उत्तम नाही. सद्यस्थितीत केवळ भातकुली, चांदूर रेल्वे व चांदूर बाजार तालुक्यात १.२० मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. उर्वरित ११ तालुक्यांत मात्र भूर्गभातील पाण्याची पातळी ०.५० मीटरचे आतच असल्याने मार्चपश्चात जिल्ह्यास पाण्याची टंचाई जाणवणार आहे.जिल्ह्यात डिसेंबरपर्यत ९३१.० मिमीच्या तुलनेत ८७८.७ मिमी पाऊस झालेला आहे. ही ९४.३ टक्केवारी आहे. यात सर्वाधिक ८८४.७ मिमी म्हणजेच सरासरीच्या १३२.६ मिमी पाऊस दर्यापूर तालुक्यात, तर सर्वात कमी पाऊत मेळघाटात झालेला आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ७५२.२ मिमी (६७.५ टक्के)व चिखलदरा तालुक्यात ८४३.२ मिमी ( ५६.९ टक्के) पाऊस झाला.गतवर्षी १२ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. या महिन्यात पावसाचे १७ दिवस राहिले व सरासरीच्या १३१ टक्के पाऊस पडला. जुलै महिन्यात २३ दिवस पाऊस पडला. सरासरीच्या ९८ टक्के पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात १८ दिवस पावसाचे राहिले व सरासरी ७७ टक्के पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात १६ दिवस पाऊस पडला व सरासरीच्या ९३.१० टक्के पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात सात दिवस पावसाचे राहिले व सरासरीच्या ९०.२ टक्के पाऊस पडला. गतवर्षी पावसाळा पश्चात मान्सूनच्या परतीचा पाऊस जिल्ह्यात चांगला झाल्याने सुरुवातील भूजलात कमी व ऑक्टोबरपासून भूजलाचे पुनर्भरण झाले. यापूर्वी सलग चार वर्षे भूजलात कमी आल्यामुळे सध्या तीन तालुक्यांत १.२० मीटरपर्यंत वाढ व ११ तालुक्यांत ०.५० मीटरपर्यंत वाढ दिसून येत आहे.

भूजल पातळीत सरासरी ०.५० मीटर वाढ‘जीएसडीए’द्वारे १४ तालुक्यांतील १५० निरीक्षण विहिरीच्या पाहणीअंती जिल्ह्यात सरासरी ०.५० मीटरपर्यंत भूजलात वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. सद्यस्थितीत भातकुली १,०४ मी., चांदूर रेल्वे १.३४ मी व चांदूर बाजार तालुक्यात १.०३ मीटर भूजल पातळी आहे. याशिवाय अमरावती ०.२०, नांदगाव खंडेश्वर व तिवसा ०.३४, मोर्शी ०.५६, वरूड ०.६१, अचलपूर ०.००, दर्यापूर ०.१९ , अंजनगाव ०.१५, धारणी०.२९, चिखलदरा ०.०५ व धामणगाव तालुक्यात ०.५० मीटरपर्यंत भूजलात वाढ झालेली आहे.

भूजलाचे व्यवस्थापन महत्त्वाचे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत भूजलाचा अनिर्बंध उपसा होत आहे. त्याच्या तुलनेत पुनर्भरण होत नाही. भूजलस्रोत कायम टिकविणे व पुनर्भरणात होणारी तूट भरून काढण्यासाठी कृत्रिम पुनर्भरणाच्या योजना राबविणे महत्त्वाचे आहे. याशिवाय गावोगावी नवीन बोअर व त्याद्वारे उपशावरदेखील बंधने आणणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी मोर्शी व वरूड तालुक्यात भूजलाच्या अमर्याद उपशावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंधने आणली होती.

 

टॅग्स :Waterपाणी