जिल्हा काँग्रेसतर्फे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:28+5:302021-04-12T04:12:28+5:30
अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने स्त्री शिक्षण, समानता आणि सत्यासाठी देह झिजविणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी ...

जिल्हा काँग्रेसतर्फे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन
अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने स्त्री शिक्षण, समानता आणि सत्यासाठी देह झिजविणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख होते.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांची जंयती आणि छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रतिमांना पुष्पहार अपर्ण करण्यात आले. सत्यशोधक समाजाची निर्मिती करून बहुजनांना न्याय आणि मानवता हा धर्म पाळणारे ज्याेतिबा हे खऱ्याअर्थाने शेतकरी हितरक्षक होते, असे मनोगतातून बबलू देशमुख म्हणाले. कार्यक्रमाला भैयासाहेब मेटकर, प्रकाश काळबांडे, सतीश हाडोळे, संजय लायदे, प्रदीप देशमुख, भागवतराव खांडे, भैयासाहेब वानखडे, बिट्टू मंगरोळे, संदीप रिठे, विशाल भट्टड, सतीश धोंडे, सिद्धार्थ बोबडे आदी उपस्थित होते.
---------------
थोडक्यात
भीम ब्रिगेडतर्फे महात्मा फुलेंना अभिवादन
अमरावती : भीम ब्रिगेडच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना येथील चित्रा चौकातील पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेश वानखडे, प्रवीण मोहोड, वीरेंद्र किर्तक, नितीन काळे, गौतम सवाई आदी उपस्थित होते.
------------
शहरात गावठी दारू विक्री वाढली
अमरावती : ब्रेक द चैन नुसार देशी, विदेशी दारू विक्री बंद आहे. त्यामुळे हल्ली अमरावती, बडनेरा शहरात पारधी बेड्यावरून गावठी दारू विक्रीसाठी आणली जात आहे. ही दारू धोकादायक ठरणारी आहे. पोलिसांनी गावठी दारूवर अंकुश लावावे, अशी मागणी होत आहे.