हजारोंच्या उपस्थितीत दादासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 00:28 IST2016-07-26T00:28:25+5:302016-07-26T00:28:25+5:30

माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या प्रथम स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या जन्मगावी अभिवादन सोहळा दारापूर येथील डॉ. कमलताई गवई ...

Greetings to Dadasaheb in the presence of thousands | हजारोंच्या उपस्थितीत दादासाहेबांना अभिवादन

हजारोंच्या उपस्थितीत दादासाहेबांना अभिवादन

दारापुरात मंदियाळी : बौद्धधर्मिय पारंपरिक पद्धतीने पूजन 
अमरावती : माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या प्रथम स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या जन्मगावी अभिवादन सोहळा दारापूर येथील डॉ. कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी हजारोंच्या उपस्थितीत पार पडला.भदन्त नागार्जून सुरेई ससाई, ज्ञानज्योती महास्थवीर आदी भिक्खू संघाच्या त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. दादासाहेबांना सुमनांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमासाठी दादासाहेबांचे हजारो चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. स्मृतिस्थळी तासभर ही पूजाविधी चालली.विद्यार्थ्यांनी दादासाहेबांचा जयघोष करीत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच नेत्र तपासणी शिबिरही पार पडले. संस्थेच्या अध्यक्षा कमलताई गवई, न्यायमूर्ती भूषण गवई, रिपाईचे नेते राजेंद्र गवई, कीर्ती अर्जून, राजेश अर्जून आदींनी दादासाहेबांना पुष्पांजली वाहिली.
यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखा कुभांरे संस्थेचे सचिव बाळकृष्ण अढाऊ, प्राचार्य संजय खेरडे, प्राचार्य दीपक शिरभाते, रिपाईचे रामेश्वर अभ्यंकर, जिल्हापरिषद सदस्य प्रताप अभ्यंकर, पंचायत समिती सभापती रेखा वाकपांजर, माजी जि.प.सदस्य बळवंत वानखडे, वसंतराव गवई अजीज पाटील, मतीन पटेल, प्राचार्य कुंदन अलोने, संजुत काकडे, झाडे, गवई कुटुंबियांसह हजारो चाहते, राजकीय नेते उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाकरिता डॉ.कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालय, विक्रमशिला पॉलिटेक्निक, रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय, दादासाहेब गायकवाड इंग्लिश प्रायमरी स्कूल आदिंच्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी दादासाहेबांच्या चाहत्यांची अलोट गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Greetings to Dadasaheb in the presence of thousands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.