मोठे नुकसान, शेतकरी हळहळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:01 IST2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:01:05+5:30

पाऊस तसा शेतकऱ्यांच्या आवडीचा. यावेळी मात्र तो सतत बरसत राहिला. इतका की शेत खरडून गेले, पिके सडून गेली, भाजीपाला नष्ट झाला. पीक उत्तम आहे म्हणून शेतकऱ्यांमध्ये यावेळी आनंद संचारलेला बघता आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र आहे. तो संततधार असल्यामुळे शेतात तळे साचल्याचे चित्रही कमीअधिक प्रमाणात सर्वत्र दिसले. नेहमीप्रमाणे ऐन तोंडाजवळ आलेला घास पावसाने हिरावला. तात्काळ पंचनाम्यांची गरज आहे.

Great loss, the farmer sighed | मोठे नुकसान, शेतकरी हळहळला

मोठे नुकसान, शेतकरी हळहळला

ठळक मुद्देडोळ्यातही पाणी : पिकांना संजीवनी देणारा पाऊसच मरणयातना देऊन गेला

तो बरसला; पण हिंम्मत देण्याऐवजी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून गेला
अमरावती : पाऊस तसा शेतकऱ्यांच्या आवडीचा. यावेळी मात्र तो सतत बरसत राहिला. इतका की शेत खरडून गेले, पिके सडून गेली, भाजीपाला नष्ट झाला. पीक उत्तम आहे म्हणून शेतकऱ्यांमध्ये यावेळी आनंद संचारलेला बघता आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र आहे. तो संततधार असल्यामुळे शेतात तळे साचल्याचे चित्रही कमीअधिक प्रमाणात सर्वत्र दिसले. नेहमीप्रमाणे ऐन तोंडाजवळ आलेला घास पावसाने हिरावला. तात्काळ पंचनाम्यांची गरज आहे. तालुक्यांमध्ये भेदभाव न करता जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करवून घेतले तर शंतकºयांना थोडीतरी मदत मिळू शकेल.

नदी काठावरील शेती पुराने खरडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आल्याने नमस्कारी, फत्तेपुर, वरखेड, तारखेड, कौडण्यपूर, शिदवाडी, इसापूर, चांदुर ढोरे, धामंत्री व धारवाडा या गावांतील नदी काठावरील काही शेतीत पुराचे पाणी शिरले. शेतजमीनी पाण्याखाली गेल्या. त्यामुळे शेत जमिनी खरडून गेल्या आहेत.
शनिवारी रात्री उशिरा अप्पर वर्धा धरणाचे गेट बंद केल्याने वर्धा नदीचा पूर कमी झाला. मात्र नदी काठावरील शेतीत पुराचे पाणी शिरले असल्याने शेती खरडून गेल्या. प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नायगावची १५० हेक्टर शेती पाण्याखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : चार दिवसांपासून बगाजी सागर धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदीकाठावरील दीडशे हेक्टरपेक्षा अधिक जमीन पाण्याखाली गेली. सर्वाधिक फटका हा नायगाव येथील शेतकऱ्यांना बसला. या शेताचे अद्यापही सर्वेक्षण झालेले नाही.
वर्धा नदीला आलेल्या महापुरामुळे नायगाव, दिघी महल्ले, सोनोरा काकडे, गोकुसरा, आष्टा, विटाळा गावातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. नायगाव येथील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेतीही वर्धा नदीच्या काठी आहे. महापुरामुळे शेतकऱ्यांची जमीन पूर्णता खरडून गेली आहे. त्यामुळे आमच्या शेतीचे सर्वेक्षण करून मोबदला द्यावा, अशी मागणी या भागातील शेतकरी उमेश शिसोदे, पराग शिसोदे, देवेन्द्र शिसोदे, अमित शिसोदे, रोशन बोंद्रे, सतिष ढेमरें, नामदेव राऊत, प्रमोद शेलार, रवी मोरे, गुलाब महात्मे, विनोद गोरडे यांनी केली आहे.

Web Title: Great loss, the farmer sighed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.