धामणगावात महाआरती अन् विद्यार्थ्यांना भोजन

By Admin | Updated: July 2, 2016 00:14 IST2016-07-02T00:14:09+5:302016-07-02T00:14:09+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आ़अरूण अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त धामणगावात मारोतीची महाआरती व विद्यार्थ्यांना सस्रेह भोजन तसेच शहरात वृक्षारोपण केले़

Great food for students in Mahamati and students | धामणगावात महाआरती अन् विद्यार्थ्यांना भोजन

धामणगावात महाआरती अन् विद्यार्थ्यांना भोजन

धामणगावात महाआरती अन् विद्यार्थ्यांना भोजन
अरूण अडसड यांचा वाढदिवस : मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
धामणगाव रेल्वे  भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आ़अरूण अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त धामणगावात मारोतीची महाआरती व विद्यार्थ्यांना सस्रेह भोजन तसेच शहरात वृक्षारोपण केले़ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी दूरध्वणीवरून अडसड यांना शुभेच्छा दिल्यात़
विदर्भात भारतीय जनता पक्ष वाढविण्यास त्या काळात भाजपाचे ज्येष्ठ नेते अरूण अडसड यांचा मोलाचा वाटा आहे़ आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विदर्भातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती़ पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला धामणगावात येऊन अडसड यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. शुक्रवारी दिवसभर अरूण अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ टिळक चौक येथील मारोती मंदिरात दयावान मंडळाच्यावतीने महाआरती आयोेजित केली होती. येथे शहरातील व तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती़ श्रीराम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया गावंडे यांच्या पुढाकाराने वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सस्रेह भोजन देण्यात आले. नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्षा अर्चना राऊत व उपाध्यक्ष हेमकरण कांकरीया, पं़स़सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख, बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे यांनी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Great food for students in Mahamati and students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.