अमरावती बाजार समितीवर ‘परिवर्तन’चा शानदार विजय
By Admin | Updated: September 17, 2015 00:01 IST2015-09-17T00:01:15+5:302015-09-17T00:01:15+5:30
अमरावती, भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत माजी आमदार संजय बंड यांच्या नेतृत्त्वातील परिवर्तन पॅनेलने सर्वाधिक ८ जागा...

अमरावती बाजार समितीवर ‘परिवर्तन’चा शानदार विजय
अटीतटीची निवडणूक : सहकार पॅनेलला सहा तर शेतकरी पॅनेलने उघडले खाते
अमरावती : अमरावती, भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत माजी आमदार संजय बंड यांच्या नेतृत्त्वातील परिवर्तन पॅनेलने सर्वाधिक ८ जागा पटकावून शानदार विजय संपादन केला. तर आ. यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलने ६, आ. रवी राणा यांच्या शेतकरी एकता पॅनेलने एका जागेवर विजय मिळविला. व्यापारी, अडते मतदारसंघातून सतीश अट्टल, प्रमोद इंगोले तर हमाल, तोलारी मतदारसंघातून बंडू वानखडे विजयी झालेत.
बाजार समितीची निवडणूक मंगळवारी पार पडली. नियोजित कार्यक्रमानुसार येथील तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनात बुधवारी सकाळी ९ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी, अडते, हमाल-तोलारी मतदारसंघनिहाय मतमोजणी पार पडली. सहकार सेवासंस्थेवर एकूण ११ संचालक निवडण्यात आले. यात सहकार पॅनेलने सहा तर परिवर्तन पॅनेलने पाच जागांवर विजय मिळविला. त्यानंतर ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार संचालकपदांच्या निवडीसाठी मतमोजणीला सुरूवात झाली. यात परिवर्तन पॅनेलने तीन तर शेतकरी एकता पॅनेलने एका जागेवर विजय मिळविला. त्यानंतर व्यापारी अडते मतदारसंघातून दोन तर मापारी, तोलारी मतदारसंघातून एकापदासाठी मतमोजणी झाली. यावेळी व्यापाऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
सत्तेत नसतानाही
संजय बंड यांचा ठसा
४माजी आमदार संजय बंड हे हल्ली सत्तेत नसतानाही त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त आठ जागा पटकावून सहकार क्षेत्रावर वेगळा ठसा उमटविला आहे. संजय बंड हे ‘ग्रास रुट’ कार्यकर्ते म्हणून शिवसेनेत प्रसिद्ध आहे. सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळून असल्यामुळेच त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या दिग्गजांना निकालानंतर अभ्यास करण्यास भाग पाडले आहे. त्यांनी मिळविलेल्या शानदार विजयाची चर्चा रंगली.
विजयी झालेले १८ उमेदवार
परिवर्तन पॅनेल :
प्रकाश काळबांडे (४४४), सुनील वऱ्हाडे (३५९), रंगराव बिचुकले (३०९), नाना नागमोते (३४१), प्रवीण भुगूल (३४७), श्याम देशमुख (३३९), प्रांजली भालेराव (२८३), उमेश घुरडे (३८४)
सहकार पॅनेल :
किशोर चांगोले ३५९), विकास इंगोले (३६५), किरणताई महल्ले (३३१), उषा वनवे (३५०), प्रफुल्ल राऊत (३३३), अशोक दहिकर (३१२)
शेतकरी एकता पॅनेल :
मिलिंद तायडे (२३९)
अडते, व्यापारी :
सतीश अट्टल (३२६), प्रमोद इंगोले (२७०)
हमाल, तोलारी :
बंडू वानखडे (२६८)