अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान

By Admin | Updated: February 6, 2016 00:21 IST2016-02-06T00:21:45+5:302016-02-06T00:21:45+5:30

अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

Grants under prevailing rules for unannounced schools | अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान

अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान

आश्वासन : शिक्षक महासंघाचा पाठपुरावा
अमरावती : अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याविषयाचे महत्त्व लक्षात आणून दिले. यासाठी अघोषित शाळांनी विहित नमुन्यात आपल्या शाळांची सविस्तर माहिती तत्काळ शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आवाहन शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केले आहे.
शेखर भोयर यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या ‘निर्धाराचा लढा’ या आंदोलनाला गुरुवारी भेट दिली. त्यात विना अनुदानित शाळांच्या न्यायासाठी व शिक्षकांच्या अस्तित्वाच्या लढाईत सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिष्टमंडळामध्ये आ. ना.गो. गाणार, आ. भगवान साळुंखे, तात्यासाहेब म्हसकर, खंडेराव जगदाळे, प्रशांत रेडीज, यादव शेळके, अरुण मराठे, पुंडलिक रहाटे यांचा समावेश होता. आंदोलनामध्ये सुधाकर वाहुरवाघ, उदय देशमुख, बबनराव पेठकर, नाना पाटील, सुरेश शिरसाठ, रवींद्र तम्मेवार, राजू भोरे यासह असंख्य शिक्षक बांधव उपस्थित होते.
विभागातील अघोषित शाळांना विहित नमुन्यात आपल्या शाळेचे नाव, शाळेचा यु डायस क्रमांक, इयत्तानिहाय विद्यार्थी संख्या, आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय संख्या, शाळेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, लिपिक, शिपाई यांची पदनिहाय संख्या ही सर्व माहिती शक्य तितक्या लवकर शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करावयाची आहे.
ही माहिती सादर करून शिक्षण आयुक्तांना पाठविले जाणार आहे. विना अनुदानित शाळांच्या न्याय हक्कासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अघोषित शाळांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. कोणत्याही अघोषित शाळा या अनुदानापासून वंचित राहू नये याची खबरदारी शाळांनी घ्यावी, असे आवाहन भोयर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Grants under prevailing rules for unannounced schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.