सेमाडोह येथील अनुदानित वसतिगृहाची मान्यता होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:16+5:302021-02-05T05:29:16+5:30

सेमाडोह येथील मुलींचे जय महाकाली अनुदानित वसतिगृहाचे नियंत्रण जिल्हा परिषदेकडे आहे. गत काही महिन्यांपासून हे वसतिगृह बंद होते. वसतिगृह ...

Granted hostel at Semadoh will be de-recognized | सेमाडोह येथील अनुदानित वसतिगृहाची मान्यता होणार रद्द

सेमाडोह येथील अनुदानित वसतिगृहाची मान्यता होणार रद्द

सेमाडोह येथील मुलींचे जय महाकाली अनुदानित वसतिगृहाचे नियंत्रण जिल्हा परिषदेकडे आहे. गत काही महिन्यांपासून हे वसतिगृह बंद होते. वसतिगृह बंद असताना येथे बनावट देशी-विदेशी दारूचा कारखाना थाटला होता. गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवार, २२ जानेवारीच्या रात्री ८ ते ११ वाजता दरम्यान ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. १८ लाखांच्या मुद्देमालासह दहा आरोपींना अटक करण्यात आली. सेमाडोह येथील मुलींच्या अनुदानित वसतिगृहातबाबत तक्रारी होत्या. त्या आनुषंगाने जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने मान्यता रद्द करण्यासाठी अगोदरच प्रस्ताव पाठविला आहे.

-------------

कोट

सेमाडोह येथील अनुदानित मुलींचे वसतिगृहाची मान्यता कायम रद्द करण्यासाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविला जाणार आहे. पाहणी दरम्यान हे वसतिगृह बंद असल्यामुळे भकास झाले असून, तसा अहवाल वरिष्ठांना कळविला जाणार आहे.

- दीपा हेरोळे, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Granted hostel at Semadoh will be de-recognized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.