दोन लाख कार्डधारकांना १०० रुपयांचे अनुदान
By Admin | Updated: February 27, 2015 00:21 IST2015-02-27T00:21:42+5:302015-02-27T00:21:42+5:30
दारिद्र्यारेषेखालील नागरिकांच्या शिधापत्रिकेवर जेवढ्यांची नावे आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यात पहिल्यांदाच १०० रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

दोन लाख कार्डधारकांना १०० रुपयांचे अनुदान
अमरावती : दारिद्र्यारेषेखालील नागरिकांच्या शिधापत्रिकेवर जेवढ्यांची नावे आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यात पहिल्यांदाच १०० रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १३ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ही रक्कम ३१ मार्चपर्यंत लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात १,२१,८२३ अंत्योदय व १,७२,२९१ व प्राधान्य गटाचे लाभार्थी आहेत. या कार्डधारकांना प्रतिव्यक्ती २ किलो २ रुपये दराने गहू व ३ रुपये दराने तांदूळ प्राप्त होतात. या धान्यासोबत १०० रुपये प्रतीव्यक्ती अनुदानप्राप्त होणार आहे. आता ही रक्कम एकदाच प्राप्त होणार आहे. या प्रक्रियेसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकेचे संगणकीकरण करण्यात येत आहे. तसेच शिधापत्रिकेचे विवरणपत्र तयार करण्याचेही काम सुरु आहे.
शासनाने या योजनेच्या आराखड्यास शासनाने या योजनेच्या प्राथमिक आराखड्यास ११ डिसेंबर २०१४ मध्ये पहिला आदेश काढला. यावेळी योजनेची प्रक्रिया पूर्ण करण्याची कालमर्यादा ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ठेवण्यात आली. मात्र कालमर्यादा जास्त असल्याने कामामध्ये योग्य गती राखण्यात आली नाही. कामाला गती मिळण्यासाठी राज्याचे या विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी ३ फेब्रुवारी २०१५ यांनी पुरवठा विभागाला योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत. यावेळी ३१ मार्च २०१५ ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शिधापत्रिकेचा संगणकीकृत डाटा-प्रिंटेड फॉर्म उपलब्ध करुन दिल्यामुळे योजनेच्या कामाला गती मिळाली आहे.