चिमुकलीसोबत आजोबाचे अश्लील चाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:26 IST2018-01-06T23:26:06+5:302018-01-06T23:26:53+5:30
तीन वर्षीय चिमुकलीसोबत आजोबाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी उघडकीस आला.

चिमुकलीसोबत आजोबाचे अश्लील चाळे
आॅनलाईन लोकमत
अमरावती : तीन वर्षीय चिमुकलीसोबत आजोबाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी उघडकीस आला. या प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी दादाराव मारोती गणेश (५०,रा. वडाळी) याला अटक केली आहे.
वडाळीत राहणाऱ्या तीन वर्षीय चिमुकलीला शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आजोबाने घरात बोलावून दार बंद केले. दुपारी २.३० वाजता ती मुलगी बाहेर येताच रडायला लागली. मुलगी रडत असल्याचे पाहून तिच्या आईने विचारपूस केली. दरम्यान, आजोबाच्या अश्लील चाळ्यांची माहिती तिने आईला दिली. त्यामुळे आईने आजोबाची कानउघाडणी केली. त्यानंतर आईने फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. याप्रकरणात पोलिसांनी दादाराव गणेशविरुद्ध भादंविच्या कलम ३५४, ३५४ (अ), पोक्सो ८, १२ अॅक्टनुसार गुन्हा नोंदवून अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.