ग्रामसेवक आंदोलनावर, बुधवारी निघणार तोडगा

By Admin | Updated: July 12, 2014 23:27 IST2014-07-12T23:27:20+5:302014-07-12T23:27:20+5:30

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील २७ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या आंदोलनावर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तोडगा निघणार आहे. मागील आठ दिवसांपासून 'ग्रेड पे'

Gramsevak agitation will go out on Wednesday | ग्रामसेवक आंदोलनावर, बुधवारी निघणार तोडगा

ग्रामसेवक आंदोलनावर, बुधवारी निघणार तोडगा

धामणगांव रेल्वे : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील २७ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या आंदोलनावर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तोडगा निघणार आहे. मागील आठ दिवसांपासून 'ग्रेड पे' वाढविणारी फाईल राज्याच्या अर्थ विभागात अडकली आहे़
राज्यात २७ हजार ९२७ ग्रामपंचायती आहेत़ ग्रामसेवकांमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची कामे ८० टक्के पूर्ण झाली़ ग्रामस्वच्छता अभियानापासून तर पर्यावरण ग्रामसमृध्दी योजना असे सर्व अभियान पूर्ण झाल्याने राज्य सतत पहिल्या क्रमांकावर आहे़ परंतु ग्रामसेवकांचे प्रश्न सुटत नाही. त्यामुळे या ग्रामसेवकांनी मागील आठ दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले़ ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर झाली नाही, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा शासनाने शब्द फिरविला आहे़ कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून अद्यापही ग्राह्य धरला नाही़ २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी, प्रवास भत्ता वेतनासोबत तीन हजार रूपये करणे अशा अनेक मागण्या धूळ खात पडल्या होत्या. त्यामुळे कामबंद आंदोलनाचे हत्यार हाती घेतले असल्याचे युनियनचे अध्यक्ष कमलाकर वनवे यांनी सांगितले़

Web Title: Gramsevak agitation will go out on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.