ग्रामपंचायतीच्या आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांचा भ्रमनिरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:16+5:30
अचलपूर तालुक्यात पथ्रोटची ग्रामपंचायत सहा वॉर्डात १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. कारभारही तेवढाच मोठा आहे. मात्र, सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे गावगाड्यातील बड्या प्रस्थांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला. परिणामी गावभरात तापलेले वातावरण थंडावल्याचे दिसते. अचलपूर तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.

ग्रामपंचायतीच्या आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांचा भ्रमनिरास
पथ्रोट : स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होताच गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांचा भ्रमनिरास झाल्याचे चित्र पथ्रोटमध्ये पसरलेले आहे.
अचलपूर तालुक्यात पथ्रोटची ग्रामपंचायत सहा वॉर्डात १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. कारभारही तेवढाच मोठा आहे. मात्र, सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे गावगाड्यातील बड्या प्रस्थांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला. परिणामी गावभरात तापलेले वातावरण थंडावल्याचे दिसते. अचलपूर तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यापूर्वी अनेक गावपुढारी सरपंचपदाकडे डोळे लावून होते. मात्र, बुधवारी सोडत जाहीर होताच सरपंचपदाच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले.
अचलपूर तालुक्यात महत्त्वाच्या व मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये पथ्रोट, शिंदी, धामणगाव गढी, येसूर्णा, चमक, सावळापूर, खेल देवमाळी, वडगाव फत्तेपूरसह एकूण १६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
आरक्षण सोडतीमुळे राजकीय नेत्यांनी ठरवलेले डावपेच फोल ठरले असून, स्थानिक राजकारणासह गावपातळीच्या ‘मंत्रालया’त राम नसल्याची कुजबुज सुरू आहे. आपल्या कानाखालचा उमेदवार निवडून सरपंच ठरवावा, असा बेत ते आखत आहेत. त्यातच थेट सरपंच निवड रद्द केल्याने काही सरपंचपद अनुचित राखीव झाल्याने ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी गत झाल्याचे निदर्शनास येते.