शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे होणार नगरपंचायतीमध्ये समायोजन, अर्हतेच्या पूर्ततेसाठी तीन वर्षांची सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:19 IST

अमरावती : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करताना तेथे कार्यरत ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कर्मचा-यांचे समायोजन करण्यासाठी शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेमधून सूट देण्यात आली आहे

जितेंद्र दखने अमरावती : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करताना तेथे कार्यरत ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कर्मचा-यांचे समायोजन करण्यासाठी शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेमधून सूट देण्यात आली आहे, तर ५० वर्षांपेक्षा कमी वय असणा-या कर्मचा-यांना संबंधित तांत्रिक अर्हतेच्या पूर्ततेसाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.तत्कालीन ग्रामपंचायतीमधील कार्यरत कर्मचा-यांची शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेची पूर्तता नसणे, आकृतिबंधात पदे उपलब्ध नसणे अथवा पदसंख्या कमी असणे आदी कारणांमुळे नगरपंचायत स्थापनेपूर्वी कर्मचा-यांच्या समायोजनासंदर्भात अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने निर्णय घेतला आहे. या तरतुदीनुसार नवनिर्मित नगरपंचायतीमधील समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पात्र असूनही समायोजन न झालेल्या कर्मचा-यांना जिल्ह्यातील अन्य नगरपंचायतींमधील रिक्त पदांवर घेतले जाणार आहे. याकरिता ज्येष्ठता व अर्हतेनुसार क्रम ठरवला जाणार आहे. ज्या कर्मचा-यांची नगरपंचायत घोषणेपूर्वी नियुक्ती झाली आहे, अशा कर्मचा-यांचे पदे उपलब्ध नसल्याने समायोजन न झाल्यास त्यांच्या वेतनाची पदे उपलब्ध होईपर्यंतची जबाबदारी संबंधित नगरपंचायतीवर राहणार आहे. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीने समावेशनासाठी शिफारस केलेल्या कर्मचाºयांना संबंधित नगरपंचायतींच्या मुख्याधिका-यांनी दोन आठवड्यांच्या आत नियुक्ती आदेश देणे गरजेचे आहे.मोठ्या ग्रामपंचायत कर्मचा-यांना बसणार फटकाअनेक ग्रामपंचायतींमध्ये राजकीय सोय लक्षात घेऊन नोकरभरती करण्यात आली. नगरपंचायतीकरिता शासनाने ठरविलेला आकृतिबंध बंधनकारक आहे. त्यापेक्षा जास्त कर्मचा-यांचे समायोजन इतर नगरपंचायतींमध्ये होऊ शकते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत