आयुक्त कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण
By Admin | Updated: September 23, 2015 00:32 IST2015-09-23T00:32:54+5:302015-09-23T00:32:54+5:30
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत अनियमितता असल्यामुळे अन्याय होत असून १० टक्के आरक्षणातील भरती प्रक्रिया सुरू करावी..

आयुक्त कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण
सेवाज्येष्ठता यादीत अनियमितता : १० टक्के पदभरती करावी
अमरावती : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत अनियमितता असल्यामुळे अन्याय होत असून १० टक्के आरक्षणातील भरती प्रक्रिया सुरू करावी या मागणीसाठी वाशीम जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.
सेवाज्येष्ठता यादीतील भरतीस पात्र ग्रामपंचायत कर्मचारी यांची २७ जुलै रोजी वाशीम जिल्हा परिषदमध्ये मुलाखती घेण्यात आल्यात. मात्र सेवाज्येष्ठता यादी सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध केली नसल्याने कर्मचाऱ्यांनी आक्षेप नोंदविला व १० टक्के आरक्षणातून होणाऱ्या पदभरतीमध्ये स्थगिती मिळाली होती. मात्र भरतीमध्ये प्राधान्य मिळाले नाही यासाठी जि.प. कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी आश्वासन दिले. परंतु हे आश्वासन पाळल्या गेले नाही याच्या निषेधार्थ मागणी मान्य होईस्तोवर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यात किसन डोंगरे, गजानन जाधव, गफार शहा, विष्णू गुधाने, किशोर शिंदे, विवेक वावगे, बबन बाजड, शेषराव नवले, संतोष गवळी, परमेश्वर भगत, रमेश मेश्राम, संतोष खलेकर आदींचा समावेश आहे