ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू

By Admin | Updated: October 15, 2015 00:28 IST2015-10-15T00:28:10+5:302015-10-15T00:28:10+5:30

जिल्ह्यात नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ५ ग्रामपंचातींच्या सार्वत्रिक व ५३ ग्रामपंचायतींच्या ८२ सदस्यपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Gram Panchayat election process | ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू

ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू

१ नोव्हेंबरला मतदान : पाच ग्रा.पं.ची सार्वत्रिक, ८२ सदस्यांसाठी पोटनिवडणूक
अमरावती : जिल्ह्यात नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ५ ग्रामपंचातींच्या सार्वत्रिक व ५३ ग्रामपंचायतींच्या ८२ सदस्यपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरला मतदान व ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यात तिवसा तालुक्यामधील दिवानखड, मार्डी, दर्यापूर तालुक्यामधील रामतीर्थ, रुस्तमपूर व चिखलदरा तालुक्यामधील काकदरी या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
तसेच चिखलदरा तालुक्यामधील सोनापूर, टेंभुरखेडा, हतरु, रुईपठार, चिचखेड, रायपूर, कुलंगना, काटकुंभ, माखला, खिरपानी, सोमठाना, अढाव, खटकाली व आमझरी तसेच तिवसा तालुक्यामधील सार्सी, अनकवाडी, कवाडगव्हाण, मोर्शी तालुक्यामधील गोराळा, बेलोना, शिरुर व मायवाडी, चांदूरबाजार तालुक्यातील गोविंदपूर, कल्होडी, खरपी, मासोद, मिर्झापूर, तळणीपूर्णा, विश्रोळी, धामणगाव तालुक्यात विटाळा, वसाड, चांदूररेल्वे तालुक्यात कळमजापूर, एरड, पाथरगाव, व धोत्रा, अमरावती तालुक्यात बोरगाव धर्माळे, कुंडसर्जापूर, जळका शहापूर, वरुड तालुक्यात गणेशपूर व शहापूर, धारणी तालुक्यात वैरागड, सुसर्दा व गोंडवाडी, दर्यापूर तालुक्यात कळमगव्हाण, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, निमझरी, बेलखेडा, पिंपळखुटा, वझ्झर व भातकुली तालुक्यात जसापूर, बैलमारखेडा, परलाम, मार्की व हातखेडा ग्रामपंचायमध्ये ८२ सदस्यपदासाठी पोटनिवडणूक होत आहे. अर्जदाखल करण्याची पहिल्या दिवशी अर्जाची संख्या निरंक आहे.

Web Title: Gram Panchayat election process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.