आज जारी होणार ग्रामपंचायत निवडणुकीची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:29 IST2020-12-15T04:29:49+5:302020-12-15T04:29:49+5:30
भातकुली/ मोर्शी : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान; तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. ...

आज जारी होणार ग्रामपंचायत निवडणुकीची नोटीस
भातकुली/ मोर्शी : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान; तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने १५ डिसेंबर रोजी संबंधित तहसीलदार आपआपल्या तालुक्यातील निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत.
निवडणुकांसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज शासकीय सुटी वगळून स्वीकारले जातील. त्यांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप होईल. विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या.
तालुका ग्रामपंचायत प्रभाग सदस्य
अमरावती ४६ - १५४- ४१६
भातकुली ३६- ११६- ३१२
तिवसा २९- ९८- २६१
दर्यापूर ५०- १६३- ४४४
मोर्शी ३९- १३१- ३४९
वरूड ४१- १३९- २७९
अंजनगाव ३४- ११७- ३१२
अचलपूर ४४- १४७- ३९९
धारणी ३५- १२१- ३३३
चिखलदरा २३- ७१-१९९
नांदगाव खंडेश्वर ५१- १५९- ४१९
चांदूर रेल्वे २९- ९३- २३५
चांदूर बाजार ४१- १४०- ३८१
धामणगाव रेल्वे ५५- १७४- ४५७