ग्रामपंचायत धारणमहू , पत्नी सरपंच, पती उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:35 IST2021-02-20T04:35:30+5:302021-02-20T04:35:30+5:30

धारणी : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींमध्ये गत आठवड्यात सरपंच आणि उपसरपंचांची निवड झाली. या निवडणुकीमध्ये धारणमहू येथे एका दाम्पत्याने ही ...

Gram Panchayat Dharanmahu, wife Sarpanch, husband Deputy Sarpanch | ग्रामपंचायत धारणमहू , पत्नी सरपंच, पती उपसरपंच

ग्रामपंचायत धारणमहू , पत्नी सरपंच, पती उपसरपंच

धारणी : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींमध्ये गत आठवड्यात सरपंच आणि उपसरपंचांची निवड झाली. या निवडणुकीमध्ये धारणमहू येथे एका दाम्पत्याने ही दोन्ही पदे पटकावली.

धारणमहू येथील सरपंचपदी रामप्यारी राजकुमार मालवीय यांची, तर त्यांचे पती राजकुमार मालवीय यांची सर्वानुमते उपसरपंचपदी निवड झाली. सरपंच आणि उपसरपंचपदी पती-पत्नी विराजमान झाल्याची तालुक्यातील ही पहिलीच नोंद आहे. राजकुमार मालवीय हे काँग्रेस पक्षाचे असून, त्यांनी पूर्ण पॅनल निवडून आणले. पदावर अविरोध निवड करून उर्वरित सदस्यांनीदेखील त्यांच्यावर विश्वास दाखविला.

विशेष असे की, धारणी तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीकरिता राखीव आहेत. त्यामुळे सध्या तरी तालुक्यात सरपंचांपेक्षा उपसरपंचांची सत्ता चालते. तथापि, सध्या युवकांनी निवडणुकीमध्ये बाजी मारली असून, सुशिक्षित आदिवासी युवक ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले आहेत.

Web Title: Gram Panchayat Dharanmahu, wife Sarpanch, husband Deputy Sarpanch