पुसला येथील स्मशानभूमीत ग्रामजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:24 IST2019-05-06T23:24:19+5:302019-05-06T23:24:24+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पुसला येथील स्मशानभूमीत ग्रामजयंती साजरी करण्यात आली.

पुसला येथील स्मशानभूमीत ग्रामजयंती उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पुसला येथील स्मशानभूमीत ग्रामजयंती साजरी करण्यात आली.
राष्ट्रसंतांचा जन्मदिवस ग्रामजयंती म्हणून साजरा केला जातो. राष्टÑसंतांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार तळागाळात झिरपावे आणि रुजावेत, यासाठी वरूड तालुक्यातील पुरला येथे स्मशानभूमीत ग्रामजयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शामाप्रसाद मुखर्जी महाविद्यालयाचे प्राचार्य फुलारी, हभप विजय खंडेलवाल, पं.स. उपसभापती चंदू अळसपुरे, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष नितीन खेरडे, सरपंच सारिका चिमोटे, देवेंद्र कांडलकर, प्रकाश अळसपूरे, धनराज बमनोटे, अनिल तडस, अभिजित अळसपुरे, सुमन अकर्ते, पुष्पलता फुटाणे, विनायक दिवाण, किरण चिमोटे, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धांविषयी प्रबोधन करण्यात आले. संचालन त्रिशूल दिवाण व किरण चिमोटे यांनी केले.